हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन, त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांकडे असते. पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्या माध्यमातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचा शोध मोहिमेअंतर्गत वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरातील बेपत्ता असलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी ‘मुस्कान’ नावाची विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून, ही मोहीम ८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट पर्यंत १४ दिवसाच्या कालावधीपर्यंत चालणार आहे. या १४ दिवसात बेपत्ता असलेल्या ४७ मुलामुलींचा शोधून आणण्याचा निर्धार पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
शहरातून अल्पवयीन मुलं-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. ही बेपत्ता असलेल्या मुलामुलींकडून वाईट कृत्य करून घेतले जाण्याची शक्यता असते. या चालू वर्षात जानेवारी ते जुलै या ७ महिन्याच्या कालावधीत तब्बल ३६१ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाले होते. त्यात १०७ मुले तर २६२ मुलीचा समावेश होता. या ७ महिन्यात ३२२ मुलामुलींचा शोध लागला असून, उर्वरित ४० मुली व ७ मुलांचा शोध लागलेला नाही. बेपत्ता असेलल्या मुलामुलींचा अपहरणाचा गुन्हा दाखल करत अशा प्रकरणाचा गांभीयाने तपास करण्याचे आदेश दाते यांनी दिले आहेत.
हे ही वाचा:
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!
आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?
भारतीय लष्कराच्या डॉक्टरचे चीनकडून अपहरण आणि हत्या
‘मुस्कान’ नावाची ही मोहीम ८ ते २१ ऑगस्ट पर्यंत राबवली जाणार आहे. ही मोहीमेच्या माध्यमातून या बेपत्ता झालेल्या मुलांचा १०० टक्के शोध घेण्यात येणार असून, ‘भरोसा कक्ष’ आणि ‘अनैतिक मानवी वाहतूक’ विभागाला ही मोहीम सोपविण्यात येणार आहे. या शोध मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी दोन मुलांचा शोध लागला, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक विभाग वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सांगितले. तसेच उर्वरित प्रकरणातील तपासासाठी विविध पथके स्थापन करून, मुलामुलींचा शोध घेऊन लवकरच त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती चौधरी यांनी दिली.