पिंपरीत गायब झालेल्या ७ वर्षांच्या मुलाची अखेर हत्या झाल्याचे उघड झाले आहे. खेळण्यासाठी बाहेर जातो असे सांगून गेलेला आदित्य ओगले हा मुलगा नंतर गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शोधाशोध केली पण तो सापडला नव्हता. नंतर त्याच्या आईवडिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानंतर तपास सुरू झाला होता.
आदित्यची अपहरण करून हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता आहे. त्याचा मृतदेह एका इमारतीच्या गच्चीवर आढळला त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे उलगडू लागले. पण अद्याप अंतिम निष्कर्षावर पोलिस पोहोचलेले नाहीत. मात्र आपल्या मुलाचा मृतदेह हाती आल्यानंतर आईवडिलांना प्रचंड धक्का बसला आहे.
हे ही वाचा:
‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’
राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा
बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि
विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी
पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याने यासंदर्भात तपास सुरू केला असून त्यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून आदित्यच्या सुटकेसाठी २० कोटी रुपयांची खंडणी त्याच्या वडिलांकडे मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वडील गजानन ओगले हे व्यवसायाने बिल्डर असून आदित्य गायब झाल्यानंतर त्यांना अज्ञात इसमाचा फोन आला होता. त्याने २० रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. आता ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी एक ओगले राहात असलेल्या इमारतीतलाच असल्याचेही बोलले जात आहे.
या मुलाला क्लोरोफॉर्म लावून बेशुद्ध करण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे. त्या क्लोरोफॉर्मचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
यामुळे आदित्यचा मृत्यू नेमका अपहरणातून झाला आहे अथवा त्यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे.