बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या मुंबईमध्ये आहेत. शनिवारी मीरारोड येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबार झाला. या दरबारामध्ये धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ऐकण्यासाठी लाखो लोकांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात गर्दीच फायदा घेत चोरटयांनी मंगळसूत्र आणि चेन वर हात साफ केला . चोरटयांनी जवळपास ४ लाख ८७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. या चोरटयांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलांचे गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र चोरी प्रकरणातील सहा आरोपींना मीरारोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मीरा रोड येथील भव्य मैदानावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दरबार सुरु झाला. रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु असलेल्या दरबारात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरबार संपल्यावर एकीकडे लोक घराकडे निघाले होते. त्याच वेळी सुमारे ५० ते ६० महिला मीरा रोड पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाल्या असल्याचे दिसले. पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिला खूपच अस्वस्थ दिसत होत्या. या सर्व महिलांनी मंगळसूत्र आणि गळ्यातील चेन चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल केल्या.
हे ही वाचा:
‘त्या’ विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी
ठाण्याची एकमेव धावपटू निधीसिंगला चेन्नईमध्ये यश
तुर्की-सीरियानंतर आता ६. ७ तीव्रतेच्या भूकंपाने इक्वेडोर हादरले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा
स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३६ महिलांनी मंगळसूत्र आणि गळ्यातील चेन चोरीच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल केल्या आहेत. या महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार चोरलेल्या सोन्याचा ऐवज अंदाजे सुमारे ४ लाख ८७ हजार रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला . त्यानंतर पोलिसांनी बागेश्वर बाबांच्या शनिवारच्या कार्यक्रमात चोरी प्रकरणात सहा आरोपींना रविवारी पोलिसांनी अटक केली .