बकरीचोर समजून तीन अल्पवयींना मारहाण; एकाचा मृत्यू

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच या मुलाने जीव सोडला

बकरीचोर समजून तीन अल्पवयींना मारहाण; एकाचा मृत्यू

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील उखलद गावात जमावाकडून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील एका जमावाने बकरीचोरीच्या संशयावरून तीन मुलांना बेदम मारहाण केल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच या मुलाने जीव सोडला तर अन्य दोघा मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या मुलांची जमावाच्या ताब्यातून सुटका करून रुग्णालयात पोहोचवले. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

याआधीही महाराष्ट्रात जमावाकडून हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सांगली जिल्ह्यात मुले चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याच्या संशयावरून जमावाने साधूंवर हल्ला केला होता.

 

ही घटना जत तालुक्यातील लवंगा गावात झाली होती. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चारही साधू उत्तर प्रदेशात राहणारे होते आणि एका गाडीमधून कर्नाटकच्या बिजापूरमधून पंढरपूरच्या मंदिरात जात होते. ते रस्ता विचारत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

२०२०मध्ये पालघरमध्ये झालेली जमावाकडून हत्या
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये १६ एप्रिल २०२० रोजी जमावाकडून हत्या झाली होती. येथेही मुले चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याच्या संशयावरून दोन साधूंसह तिघांना बेदम मारहाण करण्यात आली होती.

हे ही वाचा:

कार्यमुक्त करीत नसल्याने पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 

‘माझ्या पुतणीचा कुस्तीपटू आंदोलक गैरवापर करत आहेत’

कांदिवलीतील प्रेमप्रकरणातून हत्या करणाऱ्या प्रयागराज येथून अटक 

‘मावळ्या’ची मोहीम फत्ते…!

जमावाने ७० वर्षीय कल्पवृक्ष गिरी आणि ३५ वर्षांचे साधू सुशील गिरी आणि त्यांचा चालक नीलेश तेलगाडे यांची हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी सुमारे अडिचशे जणांना अटक केली होती. दोन्ही साधू गाडीतून मुंबईहून सुरत येथे जात होते. तेव्हा पालघरमधील गडचिंचले गावात जमावाने त्यांची हत्या केली होती.

Exit mobile version