25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

तीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Google News Follow

Related

लोअर परळ या ठिकाणी एका चाळीतील खोलीत १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी तिघेजण अल्पवयीन आहेत. त्यांना डोंगरी बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. इतर तिघांना अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या तीन जणांपैकी एक जण मुलीचा मित्र असून त्याने मुलीला मित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून लोअर परळ येथील चाळीत राहणाऱ्या मित्राच्या घरी आणले होते.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या कार्यालयात होमहवन की तंत्रसाधना?

जयंत पाटील म्हणतात, आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना

जयराम गोरेंच्या वडिलांकडून घातपाताचा संशय व्यक्त

सावरकरांवरील वक्तव्य राहुल गांधींच्या अंगलट येणार

त्या ठिकाणी आधीच पाच जण उपस्थित होते. मध्यरात्री या खोलीतून आरडाओरड सुरू असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले असता ना.म.जोशी मार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीने तक्रार दाखल केली असून आता दोषींविरोधात तपास सुरू करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात १६ वर्षीय मुलीवर सावत्र बापाने (४२ वर्षीय) बलात्कार केल्याची घटना घडली होती. शिवाजी नगर पोलिसांनी त्यासंदर्भात तक्रार दाखल करून त्या सावत्र बापाला अटक केली आहे.

पालघरमध्येही एका मुलीवर अत्याचाराची घटना नुकतीच उघड झाली होती. अशा घटनांमध्ये पालकांचीही मोठी जबाबदारी असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपली मुले कुणासोबत आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत याची खातरजमा करण्याची गरज सध्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली जात आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा