31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाएनआयएवर ठपका ठेवत ठाकरे सरकारला वाचविण्याची मलिकांची खटपट

एनआयएवर ठपका ठेवत ठाकरे सरकारला वाचविण्याची मलिकांची खटपट

Google News Follow

Related

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेवरच (एनआयए) ठपका ठेवत राज्य सरकारला या प्रकरणातून अलगद बाहेर काढण्याची कसरत राष्ट्रवादीचे नेते आणि समाजकल्याण मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी केली.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जे आरोपपत्र दाखल केले आहे त्यात परमबीर यांच्यावर कोणतेही आरोप ठेवण्यात आले नाहीत, असा आरोप करत परमबीर हेच या संपूर्ण प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे याला पुन्हा पोलिस दलात नियुक्त करण्यासाठी जबाबदार असल्याचे सांगत ठाकरे सरकारची यात कोणतीही भूमिका नाही, हे ठसविण्याचा प्रयत्न मलिक यांनी केला. ठाकरे सरकारची दिशाभूल करत परमबीर यांनी वाझे यांची नियुक्ती केली आणि त्याला विशेष अधिकार दिले, असे मलिक यांचे म्हणणे आहे.

सचिन वाझे याला या प्रकरणात मुख्य आरोपी करण्यात आले आहे. खंडणीसाठी वाझेने हे सगळे कट कारस्थान रचले असे म्हटले गेले आहे. पण हे अर्धसत्य असल्याचे नवाब मलिक यांना वाटते आहे. एवढेच नव्हे तर परमबीर यांना वाचविण्यासाठी  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच अडकविण्याचा हा घाट एनआयएने घातला आहे, असा शोधही मलिक यांनी लावला आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ ठेवण्याचे प्रकरण आणि त्याच गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची झालेली हत्या यासंदर्भात १० हजार पानी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता या आरोपपत्रातील धक्कादायक मजकूर समोर येऊ लागला आहे. या आरोपपत्रात एकूण १० जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांना मुख्य आरोपी का केले गेले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एक प्रकारे राष्ट्रीय तपास यंत्रणांवर आरोप करत सचिन वाझे ऐवजी परमबीर सिंह यांच्याकडे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारकडून होताना दिसत आहे.

या आरोपपत्रावर बोलताना अनिल देशमुख हे अडकविले गेले आहेत, असा निष्कर्षही मलिक यांनी काढला आहे.

हे ही वाचा:

भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर

‘इंडियन आयडल फेम’ सायली का आहे आशाताईंची भक्त

सचिन वाझेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जनतेला उत्तर द्यावे

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

काय म्हणाले मलिक?
राष्ट्रीय तपास यंत्रणेने जी चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यात म्हटले आहे की, सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपये माजी पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनी दिले होते. परमबीर सिंग यांनीच वाझेला पोलीस दलामध्ये सामावून घेतले. त्यांना विशेष अधिकार देण्यात आले. या घटना झाल्यानंतर या घटनेची चौकशी वाझेच्या हातात देण्याचे काम आयुक्तांनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा