म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे

ईडीने पुणे सायबर पोलिसांना पत्र पाठवत या प्रकरणाची सर्व कागदपत्रे मागवली होती. त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी तपासाची सर्व कागदपत्रे ईडीकडे सोपवली आहेत.

म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे

महाविकास आघाडीच्या काळात गाजलेल्या म्हाडा, आरोग्य भरती आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) घोटाळ्यांचा तपास आता ईडीकडे जाणार आहे. ईडीने पुणे पोलिसांकडून या प्रकरणांची कागदपत्रे मागवली आहेत.

ईडीने पुणे सायबर पोलिसांना पत्र पाठवत या प्रकरणाची सर्व कागदपत्रे मागवली होती. त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी तपासाची सर्व कागदपत्रे ईडीकडे सोपवली आहेत. पुणे सायबर पोलिसांनी म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटीचा घोटाळा उघडकीस आणला होता. या प्रकरणात पोलिसांनी बड्या अधिकाऱ्यांना देखील अटक केली होती.

म्हाडा, टीईटी आणि आरोग्य भरती या घोटाळ्यात लाखो रूपयांची उलाढाल झाल्याचं उघड झालं होतं. त्याचबरोबर शिक्षण विभागातील अधिकारी तुकाराम सुपे यांचा म्हाडा पेपरफुटी घोटाळ्यात हात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर या घोटाळ्यात अनेकजणांना अटक करण्यात आली आहे. ही तीन प्रकरणे गुंतागुंतीचे आहेत. आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास सुरू असतानाच पुणे सायबर पोलिसांना म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले. म्हाडाच्या पेपर फुटीचा तपास सुरू असताना टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला.

हे ही वाचा:

सुवर्णपदक हुकणाऱ्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन

नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?

अस्लम शेख… चुकीला माफी नाही!

आणि अविनाश साबळेने जिंकले राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील स्टीपलचेसचे पहिले पदक

दरम्यान, टीईटी प्रकरणात ७ हजार ८०० विद्यार्थी पद्धीतीने परीक्षेला बसल्याचे दोन दिवसांपूर्वीच पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्याची यादी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवली जाईल. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Exit mobile version