दिल्ली एनसीआरमध्ये एक गुप्त मेथॅम्फेटामाइन निर्मिती प्रयोगशाळेचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे, ही लॅब दिल्लीच्या तिहार कारागृहातील वॉर्डनद्वारे चालवली जात होती. एनसीबीचे ऑपरेशन युनिट आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मिळून या लॅबचा भांडाफोड केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने २५ ऑक्टोबर रोजी गौतम बुद्ध नगरच्या कसना औद्योगिक परिसरात छापा टाकला होता. यावेळी घन आणि द्रव अशा दोन्ही प्रकारात सुमारे ९५ किलो मेथॅम्फेटामाइन सापडले होते. याशिवाय ॲसिटोन, सोडियम हायड्रॉक्साईड, मिथिलीन क्लोराईड, प्रीमियम ग्रेड इथेनॉल, टोल्युइन, रेड फॉस्फरस, इथाइल ॲसिटेट आणि आयात केलेली यंत्रसामग्रीही जप्त करण्यात आली होती.
हे ही वाचा :
शरद पवारांची पाचवी यादी; पंढरपूर, माढा जागेवर दिले उमेदवार
शांघायच्या ग्लोबल परिषदेत यशवंतराव चव्हाण केंद्र भारताचे प्रतिनिधित्व करणार!
घटस्फोटांचा निर्णय न्यायालयच देणार, शरीयत परिषद नव्हे!
भाजपाची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत १४८ जागांवर दिले उमेदवार!
पथकाने छापा टाकला तेव्हा उपस्थित असलेल्या एका दिल्लीस्थित व्यापाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिहार तुरुंगातील एका वॉर्डनचा बेकायदेशीर कारखाना उभारण्यात, रसायने खरेदी करण्यात आणि यंत्रसामग्री आयात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. विशेष म्हणजे, या व्यावसायिकाला यापूर्वी डीआरआयने अंमली पदार्थांच्या प्रकरणात अटक केली होती, त्यानंतर त्याची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
याचदरम्यान, तिहार तुरुंगातील वॉर्डन बरोबर ओळख झाली आणि तो त्याचा साथीदार झाला. या प्रकरणाचा उलगडा होताच चौघांना अटक करण्यात आली. एनसीबीने आरोपींना २७ ऑक्टोबर रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.