रात्री पुरुष सकाळी तृतीयपंथी

दोन पुरुषांनी तृतीयपंथियांचा वेष धारण करून लोकांना लुटल्याची घटना समोर आली आहे

रात्री पुरुष सकाळी तृतीयपंथी
घरातील शुभकार्याच्या निमित्ताने बऱ्याचवेळा तृतीयपंथी तिथे येऊन आशीर्वाद देतात आणि पैसे घेऊन जातात.  याचाच फायदा घेत दोन पुरुषांनी तृतीयपंथियांचे वेष धारण करून लोकांना लुटले. याचा फायदा घेत दोन पुरुषांनी तृतीयपंथियांचा वेष धारण करून लोकांना लुटल्याची घटना समोर आली आहे
कळव्याला राहणारे रितेश सोळंकी आणि अमर शिंदे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत.  रोज  सकाळी ते घरातून निघताना साधे कपडे घालून निघायचे. परंतु मुंबईला पोहोचल्यावर ते निर्मनुष्य ठिकाणावर जाऊन  साडीचोळी परिधान करायचे आणि लोकांना लुटायचे. मग संध्याकाळी येताना परत साधे कपडे घालून घरी परतायचे. पण हा डाव त्यांचा चुकला जेव्हा त्यांची भेट एका १८ वर्षीय मुलीशी झाली. ती मुलगी कॉलजवरून घरी परत येत असताना या दोघांनी तिला अडवले. तिला बोलण्यात व्यस्त करून तिच्या हातातली सोन्याची अंगठी त्यांनी सटकावली. घरी आल्यावर त्या मुलीला तिच्या सोन्याची आंगठी नसल्याचे कळले आणि तिला दुपारचे हे प्रकरण आठवले. तिने तिच्या आई वडिलांना या घटनेची कल्पना दिली आणि ते सर्व दादासाहेब भीमराम मार्ग पॉलिए स्टेशनला  पोहोचले आणि तक्रार नोंदवली.

हे ही वाचा:

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

‘अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल’

पोलीस निरीक्षक प्रदीप खुड्डे यांनी आपले पथक तयार केले. त्या पथकात सहायक निरीक्षक राजाराम पोळ ह्यांच्या सोबत कोळी, पाटील. देवरे, अभंग, शिंदे आणि पालवणकर ह्यांचा समावेश होता. पोलिसांनी या तक्रारीनंतर तपास सुरू केला. त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज त्यांनी नजरे खालून घातल्या. तेव्हा त्यांना दोन तृतीयपंथ दुकानदार आणि प्रवाशांकडून पैसे मागताना दिसले. त्या मुलीच्या म्हणण्याप्रमाणे या दोघांनीच तिला लुटले होते. या फुटेज मधून छायाचित्रे काढून अनेकांकडे पोहोचवण्यात आले होते. नुकतीच त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.
Exit mobile version