२० कोटीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या गजा मारणेच्या सदस्यांना अटक

खंडणी,अपहरण गुन्ह्यात गजा मारणे टोळीतील सदस्यांना अटक

२० कोटीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या गजा मारणेच्या सदस्यांना अटक

पुण्यातील कोथरूड परिसरात ‘महाराज’ या टोपण नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारने याच्या टोळीकडून एका तरुण व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले. संबंधित गजा गॅंगच्या टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यातील कॅम्प परिसरातून अटक केली. त्यामध्ये एक व्यक्ति हा सांगली जिल्ह्या परिषदेचा सदस्य आहे. तसेच व्यवसायिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमधील व्यवहारातील पैशांवरुन अपहरण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तक्रारदार यांची शेअर मार्केट व्यवहाराची कंपनी आहे. या कंपनीत हेमंत पाटील यांनी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दरम्यान तक्रारदार यांची कंपनी डबघाईला आल्याने परतावा देता आला नाही. पाटील याने वारंवार चार कोटींच्या बदल्यात २० कोटींची मागणी केली. थोड्या दिवसात चार कोटी रुपये देतो किंवा जमीन नावे करून देतो, असे तक्रारदाराने सांगितले. पैसे न दिल्यास फिर्यादीसह त्याच्या इतर सर्व कुटुंबियांणा जीवे मारण्याची धमकी दिली.

संबंधित घटनेची माहिती खंडणीविरोधी पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांना मिळाली असता, घटनेचे गांभीर्य ओळखून तपासणीसाठी दोन वेगवेगळी पथके तयार करणायात आली. दरम्यान हेमंत पाटील यांच्या मोबाईल लोकेशनची माहिती घेतली घेऊन, खंडणीचे पैस देण्याचे कबूल करण्यात आले. दरम्यान व्यावसायिकाला सोडण्यासाठी आलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. दरम्यान मारनेसह इतर साथीदारांचा शोध सुरू असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पुणे कॅम्प परिसरातून सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, हेमंत बालाजी पाटील, फिरोज महंमद शेख, अमर शिवाजी किर्दत या अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर टोली प्रमुख कुख्यात गुंड गज्या मारणे व रुपेश मारणे आणि एक अनोळखी महिला व तिच्या तीन-चार साथीदारणा विद्यापीठ पोलिसांत अपहरण, खंडणी, अपहरण, जीवे मारण्याची धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्ररकणी ३८ वर्षीय व्यवसायिकाने पोलिस स्थानकात फिर्याद नोंदवली आहे.

Exit mobile version