हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अँटिगातून गायब

हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अँटिगातून गायब

पीएनबी स्कॅमनंतर भारतातून पळालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आता अँटिगामधूनही बेपत्ता झाला आहे. अँटिगा पोलिसांनी आता यासंदर्भात तपास सुरू केला आहे. अधिकार्‍यांनी मंगळवारी यास दुजोरा दिला. चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनीही अँटिगात आलेल्या बातमीला दुजोरा दिला. वकीलाने म्हटले की, तो सोमवारी आपल्या घरातून बेटाच्या दक्षिण भागातील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये रात्रीचे जेवण करण्यासाठी निघाला. यानंतर परत आलेला नाही.

अँटिगा न्यूज रूम डॉट कॉमच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची कार रात्री उशीरा जॉली हार्बरमध्ये सापडली आहे. मात्र, तो कारमध्ये नव्हता. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना चोक्सीचे वकील अग्रवाल यांनी म्हटले की, मेहुल चोक्सी बेपत्ता आहे. त्याच्या कुटुंबाचे सदस्य चिंतेत आहेत. त्यांनी मला चर्चेसाठी बोलावले आहे. अँटिगा पोलीस याचा तपास करत आहेत. कुटुंब त्यांच्या सुरक्षेबाबत काळजीत आहे.

हे ही वाचा:
शरद पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

सहाय्यक पोलिस निरीक्षकाने केला एव्हरेस्ट सर!

धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार

मुख्यमंत्र्यांचे ज्ञान, अज्ञान की वाफा?

अ‍ँटिगा आणि बार्बुडात राहणारा ६१ वर्षीय भारतीय उद्योजक आणि गीतांजली समुहाचा मालक मेहुल चोक्सीला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाँटेड घोषित केले आहे. मेहुल चोक्सीने मेगा-घोटाळे समोर येण्याच्या एक महिना अगोदर ४ जानेवारी, २०१८ ला अँटिगाला पळून जाण्याअगोदर १३५७८ कोटींच्या पीएनबी फसवणुकीत सुमारे ७०८० कोटी रूपयांची फसवणूक केली.

चोक्सीच्या विरूद्ध पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. तो २०१३मध्ये शेयर बाजारात फसवणुकीत सहभागी होता. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत फसवणूक केल्यानंतर चोक्सी देश सोडून पळून गेला. नंतर त्यास फरार घोषित करण्यात आले. मागच्या वर्षी दाखल एका चार्जशीटध्ये ईडीने दावा केला होता की, चोक्सीने भारतीय बँकांसह दुबई आणि संयुक्त राज्य अमेरिकेत सुद्धा ग्राहक आणि बँकांची फसवणूक केली आहे. त्याची २५०० कोटींची संपत्ती ताब्यात घेण्यात आली आहे.

Exit mobile version