29 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरक्राईमनामाबाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः पुण्यात लोणकरने दूध डेअरीत शूटर्सच्या घेतल्या बैठका

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः पुण्यात लोणकरने दूध डेअरीत शूटर्सच्या घेतल्या बैठका

हल्लेखोरांना ५० हजार रु. आगाऊ देण्यात आले

Google News Follow

Related

माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची योजना आखण्यासाठी लोणकर बंधूनी हल्लेखोरासह पुण्यातील दूध डेअरीमध्ये अनेक बैठका घेतल्या होत्या, या बैठकी दरम्यान हल्लेखोराना ओळख पटविण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्या बॅनरवरील एक फोटो देण्यात आला होता अशी माहिती तपासात समोर आल्याची माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या प्रवीण लोणकर याला रविवारी पुण्यातून अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप हे पुण्यातील लोणकर यांच्या डेअरीजवळील भंगाराच्या दुकानात काम करायचे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे. हा गुन्हा करण्यासाठी लोणकर बंधूंनी गौतम आणि कश्यपला भरती केल्याचा आरोप आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फरारी असलेल्या झिशान अख्तरने या तिन्ही शूटर्सना एकत्र केल्याचा संशय आहे. या वर्षी ७ जून रोजी तुरुंगातून सुटल्यानंतर अख्तरने गुरमेल सिंग याची भेट घेतली होती.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवीण लोणकरने सिद्दीकीच्या हत्येतील आरोपींना केवळ शस्त्रे आणि रोख रक्कमच दिली नाही तर रसदही पुरवली. शूटर्सना आगाऊ रक्कम म्हणून प्रत्येकी ५० हजार देण्यात आले होते,आणि काम झाल्यावर मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते.

१४ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की त्यांनी बांद्रा परिसरात झालेल्या बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी सहा संशयितांची ओळख पटवली आहे. त्यापैकी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. गुरमेल सिंग, शिवकुमार गौतम, धर्मराज कश्यप, मोहम्मद जीशान अख्तर, प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.

हे ही वाचा:

यूपी, आसाममध्ये मदरशांना कुलूप, महाराष्ट्रात टॉनिक! |

जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड!

मूकबधिरांना आत्मनिर्भर करणाऱ्या ‘टीच’ संस्थेच्या अमन शर्मांना केशवसृष्टी पुरस्कार

बाबा सिद्दिकी यांच्यासोबत झीशान सिद्दिकीही होते टार्गेटवर

पोलिसांनी आतापर्यंत गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर यांना अटक केली आहे. मात्र, सोशल मीडियावर हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शुभम लोणकरला अद्याप पकडता आलेले नाही. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते की सिद्दीकीच्या हत्येला बिश्नोई टोळी जबाबदार आहे, असा दावा त्याचा भाऊ प्रवीण लोणकरने देखील केला होता.

मुंबई गुन्हे शाखेने प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करून १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा