29 C
Mumbai
Friday, April 4, 2025
घरक्राईमनामामेरठ हत्याकांड: मुस्कानचा पोलिसांसोबतचा आक्षेपार्ह डीपफेक व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

मेरठ हत्याकांड: मुस्कानचा पोलिसांसोबतचा आक्षेपार्ह डीपफेक व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

इन्स्टाग्राम वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा

Google News Follow

Related

मेरठ पोलिसांनी एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आक्षेपार्ह असे चित्रण दाखवण्यात आले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये गणवेशातील एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने २६ वर्षीय आरोपी मुस्कान रस्तोगीचे चुंबन घेतल्याचे दाखवले आहे. मुस्कान हिच्यावर तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने तिचा पती सौरभ राजपूत याची हत्या केल्याचा आरोप आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मेरठमधील ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनच्या एका वरिष्ठ उपनिरीक्षकाने ‘priyanshurox_31’ या इन्स्टाग्राम आयडीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर दाखल केला आहे. अलिकडेच व्हायरल झालेल्या वादग्रस्त एआय व्हिडिओमध्ये पोलिस कोठडीत असलेलीं मुस्कान ही गणवेशधारी निरीक्षकाचे चुंबन घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

निरीक्षकाने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने एआय-जनरेटेड कंटेंट बनवण्यात आला आणि प्रसारित करण्यात आला. ७५,००० हून अधिक फॉलोअर्स असलेल्या या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुस्कान आणि त्याचा बॉयफ्रेंड साहिल यांचे अनेक एआय-जनरेटेड व्हिडिओ आहेत.

४ मार्च रोजी मुस्कान आणि साहिल यांनी माजी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत यांना ड्रग्ज देऊन नंतर हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये सिमेंटने बंद करण्यात आले. त्यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशला सुट्टीवर गेले आणि सौरभच्या कुटुंबाला त्याच्या फोनवरून मेसेज पाठवून दिशाभूल करत होते. १८ मार्च रोजी पोलिसांना या प्रकरणाची तक्रार करण्यात आली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सौरभ आणि मुस्कान यांनी २०१६ मध्ये त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले आणि त्यानंतर त्यांना मुलगी झाली.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल: मोथाबाडीत तणाव कायम

मां मुंडेश्वरी धाममध्ये माता मुंडेश्वरीचा खास श्रंगार

‘मन की बात’: पंतप्रधान मोदी म्हणाले, जलसंवर्धन महत्त्वाचे!

धीम्या ओव्हर गतीसाठी हार्दिक पांड्याला दंड

मुस्कान आणि साहिल हे शाळेपासूनचे मित्र होते. २०१९ मध्ये एका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे पुन्हा संपर्कात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर १९ मार्चपासून हे दोघे चौधरी चरण सिंह जिल्हा तुरुंगात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
240,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा