30.4 C
Mumbai
Thursday, May 15, 2025
घरक्राईमनामामानहानी खटला प्रकरणी मेधा पाटकर यांना अटक

मानहानी खटला प्रकरणी मेधा पाटकर यांना अटक

न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई

Google News Follow

Related

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना शुक्रवार, २५ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आधीच अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. हे प्रकरण दोन दशके जुने असून न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार आज त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून साकेत न्यायालयात हजर केलं जाणार आहे. साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंग यांनी मेधा पाटकर यांची अनुपस्थिती आणि न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन गंभीरपणे घेतले आणि पोलिसांना पाटकर यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. न्यायाधीशांनी असे निरीक्षण नोंदवले होते की, मेधा पाटकर या जाणूनबुजून न्यायालयीन प्रक्रियेला टाळत आहेत आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत नाहीत.

दिल्लीचे विद्यमान उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी २००१ मध्ये ‘नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीज’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख असताना हा खटला दाखल केला होता. २५ नोव्हेंबर २००० रोजी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये मेधा पाटकर यांनी त्यांना देशद्रोही आणि हवाला व्यवहारात सहभागी असल्याचे म्हटले होते, असा आरोप सक्सेना यांनी केला होता. न्यायालयाने हे विधान जाणूनबुजून केलेले आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आणि ते विनय सक्सेना यांच्या प्रतिष्ठेला बदनामी करणारे असल्याचे म्हटले. गेल्या वर्षी, दंडाधिकारी न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवत पाच महिने तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

हे ही वाचा:

दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणाऱ्या उपपंतप्रधानांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतापला

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले

पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूचं; नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर

या निर्णयाविरुद्ध त्यांनी अपील केले आणि त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला. पण आता जेव्हा मेधा पाटकर यांनी शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब करायला सुरुवात केली आणि त्या न्यायालयात हजर राहिल्या नाहीत, तेव्हा न्यायालयाने कठोर भूमिका घेत पोलिसांना मेधा पाटकर यांना अटक करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा