एम. एस (मास्टर ऑफ सर्जन) डॉक्टर नसून देखील शस्त्रक्रिया करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. या डॉक्टरने दादर येथे रुग्णालय थाटून मूळव्याधावर एक नाही तर जवळपास एक हजार शस्त्रक्रिया पार पाडल्या. मात्र एका टॅक्सी चालकांवर केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्यामुळे डॉक्टरवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मुकेश कोटा (३०) असे या एमबीबीएस डॉक्टरचे नाव आहे. मुकेश कोटा याने २०१७ मध्ये आंध्रप्रदेश येथील विद्यापीठातून एमबीबीएस पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मुकेश कोटा हे मागील तीन वर्षांपासून गोपालराव नावाने दादर पूर्व या ठिकाणी क्लिनिक चालवत आहे. मूळव्याध सह इतर व्याधीवर डॉ.मुकेश कोटा हे उपचार करीत होते. त्यांनी विना शस्त्रकीया मूळव्याध वर १००टक्के उपचार केले जातील, अशी जाहिरात केली होती.
हे ही वाचा:
जमशेदजी टाटा ठरले जगातील दानशूर व्यक्ती
…तर कोविशिल्डचा एकच डोस पुरे!!
ओबीसी आरक्षणाचा ठाकरे सरकारने मुडदा पाडला
बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण स्कायवॉक पूर्ण करा!
एका टॅक्सी चालकाने काही महिन्यांपूर्वी केलेली मुळव्याध वरील शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे या टॅक्सी चालकाला अधिकच त्रास होऊ लागल्याने य टॅक्सी चालकाने परळ च्या केईएम रुग्णालयात आपला उपचार केला. चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे हा त्रास झाल्याचे कळताच या टॅक्सी चालकाने डॉ.कोटा यांच्याविरुद्ध माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
माटुंगा पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलचा सल्ला घेतला असता एम . एस ची पदवी नसतांना एमबीबीएस डॉक्टर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करू शकता नाही, आणि हा निष्काळजीपणा असल्याचे मत महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल ने दिले. यावरून माटुंगा पोलिसांनी डॉ.मुकेश कोटा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.