मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे काम करणाऱ्या ३१ वर्षीय अधिकाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणेला कथितपणे संवेदनशील माहिती लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
कल्पेश बैकर असे एटीएसने अटक केलेल्या माझगाव डॉकयार्ड मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. डॉकयार्डमध्ये स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर म्हणून काम करणाऱ्या कल्पेशला हनीट्रॅप मध्ये अडकवून संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले होते अशी माहिती समोर आली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका पाकिस्तानी महिला एजंटने सोशल मीडियावर त्याच्याशी मैत्री केली आणि ते अनेक महिन्यांपासून कथित महिलेच्या संपर्कात होते. माहितीच्या बदल्यात कल्पेशला पैसेही देण्यात आले होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुंबई उपनगरच्या हरमित सिंगला ‘महाराष्ट्र श्री’चा मान
उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता
वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!
एटीएसने एका निवेदनात म्हटले आहे की, एका भारतीय संशयिताने पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती पुरवल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या दरम्यान एटीएसने कल्पेश बैकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तपासादरम्यान, असे आढळून आले की कल्पेश या अधिकारी यांची फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२१ ते मे २०२३ दरम्यान पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणेशी संबंधित महिलेची ओळख झाली होती. त्याने तिच्यासोबत व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर चॅटिंग केल्याचे आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
एटीएसने डॉकयार्ड अधिकारी आणि कथितपणे माहिती पुरविणारा पाकिस्तानी ऑपरेटर अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉकयार्ड अधिकाऱ्याला अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून आता एटीएसकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पाकिस्तानी एजंटला कथितपणे कोणत्या प्रकारची माहिती दिली गेली याचा तपशील अधिकाऱ्यांनी उघड केलेला नाही आणि चौकशी सुरू असल्याचे सांगितले.