22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामा'मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच!'

‘मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच!’

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मॉरिसच्या बायकोचा जबाब

Google News Follow

Related

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण हळूहळू स्पष्ट होऊ लागले असून वैमनस्यातून मॉरिस नोरोन्हा याने ही हत्या केल्याचे कळत आहे. हत्या करणारा मॉरिस याच्या बायकोने दिलेल्या जबाबातून ही बाब उघड होत आहे.

गोळीबार करणाऱ्या मॉरिसचा बॉडीगार्ड पोलिसांच्या ताब्यात.घेण्यात आला आहे. त्याचे नाव मिश्रा असून त्याचीच पिस्तुल मॉरिसने गोळीबारासाठी वापरली होती.

गुन्हे शाखेकडून सुरु आहे मिश्राची चौकशी..घोसाळकर यांचे मित्र लालचंद यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालचंद हे पूर्णवेळ अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत असतात. पोलिसांनी लालचंद यांचा रात्री जबाब नोंदवला होता.

*गोळीबार करणाऱ्या मॉरिसच्या कुटुंबियाचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. मॉरिसच्या कुटुंबात आई, पत्नी आणि मुलगी आहे. मॉरिसच्या पत्नीच्या जबाबानुसार ही केस जवळपास पूर्णपणे स्पष्ट होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

बलात्काराचा गुन्ह्यात मॉरिस जवळपास ५ महिने तुरुंगात होता. अटक होण्यामागे अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे अशी त्याची समजूत होती. तुरूंगातुन बाहेर आल्यानंतर हा राग त्याच्या मनात धगधगत होता.

हे ही वाचा:

भाजप, रास्व संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी पीएफआयचा ‘रिपोर्टर’ गट!

जीन्सनंतर पायजम्यावर न्यायालयात येण्यास परवानगी द्यायची का?

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी मॉरिसच्या पीएसह एकाला घेतलं ताब्यात

फेसबुक लाइव्हनंतर गोळीबार; ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू

बायकोसमोर कित्येकदा मॉरिस ‘मी अभिषेकला सोडणार नाही त्याला संपवणारच’ असे बोलल्याचा बायकोचा पोलिसांकडे जबाब आहे.  तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अभिषेक घोसाळकर याच्याशी पुन्हा त्याने मैत्री केली आणि विश्वास संपादन केला.

मैत्रीच्या विश्वासात घोसाळकर फसले आणि इथेच त्यांचा घात झाला. मॉरिसने स्वतःसाठी एक खाजगी सुरक्षारक्षक ठेवला होता.मिश्रा नावाच्या मॉरिसच्या बॉडीगार्डकडे परवाना असलेले पिस्तुल होते.  हे पिस्तुल मॉरिसच्या कार्यालयात ठेवण्यात आलं होत. १५ काडतुसांची क्षमता असलेल्या पिस्तुलमधून सुरुवातीला ५ राउंड फायर करण्यात आले ज्यातल्या ४ गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्या.

*या गोळीबारानंतर मॉरिस कार्यालयातील पोटमाळ्यावर गेला आणि तिथे पुन्हा त्याने पिस्तूलमध्ये गोळ्या भरल्या.*

त्यानंतर मॉरिसने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा