अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणातल्या मॉरीसने म्हणून नेमला अंगरक्षक

मॉरिसच्या अंगरक्षकाला अटक

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणातल्या मॉरीसने म्हणून नेमला अंगरक्षक

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक यांचा मारेकरी मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक करण्यात आलेली असून मॉरिसचे दोन सहकारी मेहुल पारेख आणि रोहित साहू यांच्याकडे या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी ताब्यात ठेवण्यात आले आहे.

मॉरिस याने गोळीबार करण्यासाठी अंगरक्षक मिश्राची परवाना असलेली पिस्तुल वापरली होती या प्रकरणी मिश्रा याला भारतीय हत्यार कायदा कलम २९ (ब) ३० अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

बोरिवली येथील गोळीबाराचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ सह गुन्हे शाखेच्या इतर कक्ष प्रमुखांची या गुन्ह्याच्या तपासकामी मदत घेतली जात आहे. गुन्हे शाखेने या गोळीबार प्रकरणी शुक्रवारी मॉरिस नोरोन्हा याचे सहकारी मेहुल पारेख, रोहित साहू आणि अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला ताब्यात घेण्यात आले होते.

या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तुल अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे होते याकारणास्तव मिश्रा याच्याकडे चौकशी करण्यात येत होती. मिश्रा याने घटनेच्या दिवशी स्वतःचे परवाना असलेले पिस्तुल सोबत न ठेवता मॉरीस याच्या कार्यालयात ठेवून पारेख सोबत त्याच्या आईला रुग्णालयात बघण्यासाठी गेला होता. मिश्रा याने भारतीय हत्यार कायदा कलम २९ (ब) ३० नियमाचे भंग केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक केली आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडनंतर बरेलीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती, जमावाकडून दगडफेक!

जाडेजाचे वडील म्हणतात, त्याला क्रिकेटर केले नसतं तर बरं झालं असतं

जाडेजाचे वडील म्हणतात, त्याला क्रिकेटर केले नसतं तर बरं झालं असतं

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!

दोन महिन्यांपूर्वी शिजला कट….

२०२२ मध्ये मॉरिस नोरोन्हा याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात अभिषेक घोसाळकर याने अडकविल्याचा संशय मॉरिस नोरोन्हा याला होता. या गुन्ह्याचा मॉरिसला तीन महिने तुरुंगात काढावे लागले होते, तेव्हापासून मॉरीस याच्या मनात अभिषेकबद्दल मनात राग होता.

मॉरीसवर मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे परदेशात जाता येत नव्हते. या सर्व प्रकारामुळे मॉरीसला नैराश्य आले होते, या सर्व परिस्थितीला अभिषेक हा जबाबदार असल्यामुळे मॉरीस याने अभिषेक घोसाळकर याच्या हत्येचा कट दोन महिन्यांपूर्वीच रचला होता.

अभिषेकच्या हत्येसाठी त्याला पिस्तुल हवे होते, यासाठी त्याने अमरेंद्र मिश्रा याला अंगरक्षक म्हणून कामाला ठेवले होते, कामाला ठेवण्यापूर्वी मॉरीसने मिश्राला अट घातली होती. ती अट अशी होती की, घरी जाताना त्यांच्याजवळील परवाना असलेली पिस्तुल ऑफिस मध्ये ठेवून जायचे,कामाची गरज असल्यामुळे त्याने अट मान्य केली अशी माहिती मिश्रा याच्या पत्नीने एका वृत्तवहिनीशी बोलताना सांगितले.

Exit mobile version