25 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामाधर्मांतराचे रॅकेट चालवणारा मौलाना कलीम अटकेत

धर्मांतराचे रॅकेट चालवणारा मौलाना कलीम अटकेत

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश पोलिसांनी धडक कारवाई करताना मौलाना कलीम सिद्दीकी याला अटक केली आहे. ग्लोबल पिस सेंटरचा अध्यक्ष असलेल्या कलीम सिद्दीकीला धर्मांतरणाच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात हे पुढे आले आहे की मौलाना कलीम सिद्दीकीच्या ट्रस्टला परदेशातून धर्मांतरासाठी पैसे मिळत होते. बहारिन येथुन सिद्दीकीच्या ट्रस्टला १.५ कोटी रूपये मिळत होते. तर इतर देशांतून ३ कोटी रूपये मिळाले होते. उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

मुजफ्फरनगरचे रहिवासी असणाऱ्या मौलाना कलीम सिद्दीकी याने उत्तर प्रदेशात एक मोठे धर्मांतर रॅकेट चालवले होते. उत्तर प्रदेश एटीएसने या संदर्भात कारवाई करताना या मोठ्या रॅकेटचे भांडाफोड करून मौलाना कलीमच्या मुसक्या आवळल्या. मौलाना कलीम हा जामिया मिलीया नावाचा एक ट्रस्ट चालवत होता. हा ट्रस्ट अनेक मदरशांना आर्थिक निधी पुरवत होता. यास्ठी त्याला परदेशातून पैसा मिळत होता. यातूनच धर्मांतरण केले जात असे. मौलाना कलिमने अंदाजे १००० लोकांचे धर्मांतरण केल्याची बाब समोर आली आहे.

हे ही वाचा:

सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?

आयपीएलवर पुन्हा कोरोना संकट

पंजाबनंतर हरियाणामध्ये काँग्रेसवर संकट

मुंबई वगळता सर्व महापालिकांत बहुसदस्यीय प्रभा

मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी मौलाना कलिम हा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मेरठ येथे आला होता. त्यावेळी रात्री ९ वाजता नमाज नंतर आपल्या साथिदारांसोबत परतत असतानाच एटीएसने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. मौलान कलीमच्या साथीदारांच्या चौकशीवरून असे समोर आलेल्या माहितीनुसार आजपर्यंत कलीमने ५ लाखांपेक्षा अधिक लोकांचे धर्मांतरण केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा