संसद भवनात घुसखोरी करण्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार ललित झा गुरुवारी दिल्ली पोलिसांना शरण आला. बुधवारी झालेल्या या घुसखोरीनंतर तो फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत असतानाच गुरुवारी रात्री तो स्वतःहून दिली पोलिसांना शरण आला.
संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायदा यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, भारतीय दंड संहितेअंतर्गत आणखीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ललित झा हा बुधवारपासून फरार होता. गुरुवारी ललित एका अन्य व्यक्तीसोबत कर्तव्य पथ पोलिस ठाण्यात पोहोचला आणि त्याने शरमागती पत्करली. त्यानंतर त्याला स्पेशल सेलमध्ये पाठवण्यात आले.
सन २००१च्या संसदेवरील हल्ल्याला बुधवारी २२ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशीच सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोघांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली होती. तसेच, घोषणाबाजी करून नळकांडीतून पिवळा धूर सोडला होता. खासदारांनी या दोन तरुणांना लगेचच पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले होते.
हे ही वाचा:
संसदेवर हल्ला करणाऱ्यांवर दहशतवादाचा आरोप,चारही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी!
धर्मांतरित व्यक्तींना आदिवासींचे लाभ नको ! विधान परिषदेत मागणी
कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल
लोकसभेत हा गोंधळ सुरू असताना संसद भवनाबाहेर एक तरुण आणि तरुणीने पिवळा रंगाचा धूर सोडून घोषणाबाजी केली. या सर्व चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस विकी आणि ललित झा यांचा शोध घेत होते. त्यातील विकीली गुरुग्राम येथील घरातून ताब्यात घेण्यात आले. तर, झा याने शरणागती पत्करल्यानंतर त्याला गुरुवारी अटक करण्यात आली.
सुरक्षाव्यवस्था कडेकोट
संसद सुरक्षाभंगाच्या घटनेनंतर संसदेतील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. संसदेत येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे.