अमरावती हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान जेरबंद

अमरावती हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान जेरबंद

महाराष्ट्रातील अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपीला पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे. इरफान खान हा या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे. इरफान खान एक एनजीओ चालवतो. इरफान खानला नागपुरातून अटक करण्यात आली आहे.

नुपूर शर्माच्या टीकेच्या समर्थनावर, केमिस्टला मारण्याची संपूर्ण योजना इरफान खानने रचली होती आणि खुनाचे निर्देश दिले होते. अमरावतीच्या शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षक नीलिमा अराज यांनी सांगितले की, उमेश कोल्हे खूनप्रकरणी नागपुरातून आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

केमिस्ट उमेश कोल्हे (५४) यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालच्या हत्येच्या आठवडाभर आधी ही घटना घडली होती.

हे ही वाचा:

शिवसेनेचा बॉस कोण? शिंदे की ठाकरे?

बंडानंतर शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं  

धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?

अमरावती शहर कोतवालीच्या अधिकाऱ्यांनी माहितीनुसार, उमेश कोल्हे हे अमरावती शहरात मेडिकल स्टोअर चालवायचे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हाट्सअँप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. त्याने चुकून एका ग्रुपमध्ये पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये काही मुस्लिम सदस्य देखील होते. त्यांनतर मुख्य आरोपी इरफान खान याने उमेशच्या हत्येची योजना आखली होती आणि त्यासाठी लोकांना सहभागी करून घेतले होते, असेही पोलिसांनी सांगितले. इरफान खानने इतर पाच आरोपींना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि पळून जाण्यासाठी एक कार देण्याचे आश्वासन दिले होते.

Exit mobile version