उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील गोपालबाग भागात रविवारी फटाका मार्केटला अचानक आग लागली.या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत.एका मागोमाग एक अशी एकूण सात दुकाने जाळून खाक झाली आहेत.
या घटनेत गंभीर भाजलेल्या नऊ जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील गोपालबाग भागात ही घटना घडली. एका क्रमाने अशा सात विक्री करणाऱ्या फटाक्यांच्या दुकानाला आग लागली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला असून या व्हिडिओत जखमी झालेल्या लोक असह्य वेदनेने तळमळत असल्याचे दिसत आहे.ऐन दिवाळीच्या सणात अशी घटना घडल्याने शोक व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा:
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
मुंब्र्यात आव्हाडांच्या घोषणा…उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है!
१५ किलो औषधं, भाजीपाला घेऊन पहिला ड्रोन दुर्गम भागात पोहचला
मोबाईल खाली पडला असे सांगत सी लिंकवरून मारली उडी!
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवली.या घटनेत गंभीर भाजलेल्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या एका दुकानात ही आग लागली आणि झपाट्याने इतर सहा दुकानांमध्ये पसरली.
स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) अजय किशोर म्हणाले, “गोपालबाग परिसरात फटाक्यांची विक्री करणाऱ्या सात दुकानांना आग लागली. नऊ जण भाजले. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसते.”सातही दुकानांना फटाके विक्रीची परवानगी असल्याचेही त्यांनी सांगितले.या आगीत दुकानदारांचे अतोनात नुकसान झाले आहे.पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.