26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाबॉयलर स्फोटानंतर जिंदाल कंपनीला भीषण आग

बॉयलर स्फोटानंतर जिंदाल कंपनीला भीषण आग

एका महिलेचा मृत्यू , ४ गंभीर जखमी

Google News Follow

Related

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिक जवळ असलेल्या इगतपुरीमध्ये असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म लिमिटेड या कंपनीला मोठं आग लागली आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन सकाळी ११.३० वाजता ही आग लागली. बघता बघता ही आग इतकी भडकली की हवेत नुसतेच आगीचे लोळ उठताना दिसत होते. बॉयलर स्फोटात १ महिला ठार आणि ४ गंभीर जखमी झाले आहेत. तिघे आत अडकले असून १४ जणांना रेस्क्यु ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्यात आले आहे.
आग लागल्याचं कळताच या कंपनीतील कर्मचारी तिथून पळून जाऊ लागले. पण आग पसरल्यामुळे काहींना तिथून बाहेर पडता आलं नाही. हे कर्मचारी आतच अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. चार तासानंतरही ही भयानक आग आटोक्यात आलेली नाही. आगीत जीवित हानी झालेली नाही. परंतु १० ते १५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. किती कामगार आत अडकले आहेत याचा अंदाज अद्याप आलेला नाही

इगतपुरीमधील मुंढेगाव एमआयडीसीमध्ये असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म लिमिटेड कंपनीत रविवारी सकाळी हि दुर्घटना घडली. हा स्फोट इतका भयानक होता की अगदी दूरवरून आगीचे लॉट दिसून येत आहेत. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहेत. इगतपुरी, नाशिक आणि अन्य भागातून १५ ते २० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. तयाच बरोबर १०-१५ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या आहेत. स्फोटाच्या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही सविस्तर माहिती मिळाली नाही.

स्फोटातील १५ जणांना नाशिकमध्ये तर ११ जणांना सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले अजून २ जण अडकले असल्याची माहिती आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य करण्याचे प्रयत्न सुरू असून मी कायम जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा :

२०२३ वर्ष आशेचे, आनंदाचे आणि भरपूर यशाचे जावो

चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का? 

तोरा संपलाय, नक्षा उतरलाय!

 

डिझेलच्या मोठया साठ्याला धोका
आग लागलेल्या ठिकाणापासून दीडशे मीटर अंतरावर डिझेलची मोठी टाकी आहे. त्यामुळे ही भडकलेली आग या टाकीपर्यंत पोहचू नये याची काळजी घेण्यात येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाचे बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

 

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा