नवी मुंबईत एमआयडीसीत भीषण आग, ९ कंपन्या जळून खाक

नवी मुंबईत एमआयडीसीत भीषण आग, ९ कंपन्या जळून खाक

नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत नऊ कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. तसेच या आगीत चार कर्मचारी अडकल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अग्निशमन दलाकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

नवी मुंबईतीळ तुर्भे येथील रबर कंपनीला ही आग लागली आहे. पावणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब या रासायनिक कंपनीला ही भीषण आग लागली आहे. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले असून या आगीत चार कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

… म्हणून कोल्हापूर शहर १०० सेकंद झाले स्तब्ध

आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला रुद्राभिषेक

राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी गर्दी न करण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग एवढी भीषण होती की, या आगीत आजूबाजूच्या चार कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Exit mobile version