28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामाविवाहित प्रियकराने प्रेयसीला बुडवून मारले, दोन जण अटकेत

विवाहित प्रियकराने प्रेयसीला बुडवून मारले, दोन जण अटकेत

वालिव पोलिस ठाण्यात बलात्कार, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल

Google News Follow

Related

एक महिन्यापूर्वी नायगावमधून बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय हेअरस्टायलिस्ट तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या बहिणीने केली होती. या प्रकरणी तिचा प्रियकर मनोहर शुक्ला आणि त्याची पत्नी पौर्णिमा यांना अटक करण्यात आली आहे.

 

९ ऑगस्ट रोजी या तरुणीने मनोहर शुक्ला याच्यासोबत ती राहात असलेल्या इमारतीत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर तिचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज आढळले नाही. त्यामुळे संशयाची सुई तिच्या प्रियकराकडे वळली. ऑगस्ट २०१९मध्ये या तरुणीने मनोहर (३४)याच्या विरुद्ध वालिव पोलिस ठाण्यात बलात्कार, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, काही दिवसांनंतर, तिने विरार पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

 

 

नायगाव (पू) येथील सनटेक कॉम्प्लेक्समध्ये ही तरुणी एकटीच राहात असे. मनोहर तिला अनेकदा भेटायला जायचा. मनोहरसोबतच्या प्रेमसंबंधामुळे तिचे तिच्या भावंडांसोबतचे संबंध ताणले गेले होते. १२ ऑगस्ट रोजी तरुणीच्या मोठ्या बहिणीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. त्यामुळे तिने नायगाव पोलिसांशी संपर्क साधला. १४ ऑगस्ट रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती तरुणी आणि मनोहर ९ ऑगस्ट रोजी आवारात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर ती तरुणी कधीच इमारत सोडताना दिसली नाही.

 

 

संबंधित तरुणी आणि मनोहर यांचे प्रेमसंबंध होते. मात्र मनोहरने तिला फसवून दुसरे लग्न केले. त्यामुळे तिने वालीव पोलिस ठाण्यात मनोहरविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी मनोहर दबाव आणत होता. ९ ऑगस्ट रोजीही त्यांच्यात भांडण झाले. तिने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली. या वादातून त्याने तिची हत्या केल्याची कबुली मनोहरने पोलिस चौकशीत दिली.

 

 

रागाच्या भरात त्याने तिला केसांनी ओढत बाथरूममध्ये नेले आणि पाण्याने भरलेल्या बादलीत तिचे डोके बुडवले. नंतर त्याने तिचा मृतदेह खाटेवर ठेवला आणि कामावर निघून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिवसातून दोनदा इमारतीत परतत असल्याचे दिसून आले. रात्री पावणेदहाच्या सुमारास मनोहर हा पत्नी आणि मुलीसह इमारतीत परतला. नंतर ते ट्रॉली बॅग घेऊन इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर मनोहर आणि पौर्णिमा हे दोघे त्या दोघांमध्ये ठेवलेली बॅग घेऊन स्कूटरवरून निघून जाताना दिसत आहेत. तेव्हा त्यांची दोन वर्षांची मुलगी पौर्णिमाच्या मांडीवर होती.

 

हे ही वाचा:

जवानाचे रक्षण करताना सहावर्षीय लष्करी कुत्र्याचा मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाची पुतीन यांना भुरळ

डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश

११ राज्यातील बीआरओच्या ९० प्रकल्पांचे लोकार्पण

शुक्लाने हत्येची कबुली दिल्यानंतर, पोलिसांनी वलसाड पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी गेल्या महिन्यात खाडीजवळ कुजलेला मृतदेह सापडल्याचे सांगितले. टॅटूच्या आधारे हा मृतदेह नायगावमधील बेपत्ता तरुणीचा असल्याची ओळख पटली. तरीही या मृतदेहाचे डीएनए तिच्या बहिणीशी जुळवले जाणार आहेत. वलसाड पोलिसांनी तिचे डीएनए नमुने जतन करून तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. ही नियोजित हत्या होती का आणि पौर्णिमाही त्यात सहभागी होती का याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा