28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाचक्क या कारणामुळे 'शारापोव्हा' व 'शूमाकर' यांच्यावर गुन्हा दाखल!

चक्क या कारणामुळे ‘शारापोव्हा’ व ‘शूमाकर’ यांच्यावर गुन्हा दाखल!

Google News Follow

Related

टेनिसपटू मारिया शारापोव्हा आणि रेसर मायकल शूमाकर यांच्यासह अन्य अकरा जणांवर गुरुग्राममध्ये फसवणूक व गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर फसवणुकीचा आरोप महिलेने केला आहे.

२०१३ मध्ये शेफाली या महिलेने मेसर्स रियलटेक डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एका प्रकल्पात गुंतवणूक केली होती. या महिलेने गुरुग्रामच्या सेक्टर ७३ मधील शारापोवा नावाच्या टॉवरमध्ये आलिशान फ्लॅट बुक केला होता. २०१६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा दावा बिल्डरने केला होता. मात्र, त्याचे काम अजून सुरूच झालेले नाही. या प्रोजेक्‍टमध्‍ये सामील होण्‍याची जाहिरात करून ही आंतरराष्‍ट्रीय सेलिब्रिटी या फसवणुकीत सहभागी झाल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

शारापोव्हा आणि शूमाकर यांनी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली शेफालीने त्यांना गुरुग्राम न्यायालयात ओढले आहे. महिलेने कोर्टात सांगितले की, या प्रकल्पाला सुरुवातही न झाल्याने ती मानसिक त्रासातून गेली असल्याचा आरोप महिलाने केला आहे. तिने आणि तिच्या पतीने कंपन्यांला पैसे देऊनही कंपनीने घर दिलेले नाही. त्यामुळे महिलेने व्याजासह पैसे मागितले आहेत. गुंतवलेले पैसे व्याजासह परत केल्यास खटला मागे घेईन, असे या महिलेने सांगितले आहे. अशी मागणी या महिलेने केली आहे.या सर्वांविरुद्ध आयपीसीच्या कलम ३४,१२०-बी , ४०६ आणि ४२० अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

हे ही वाचा:

हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’

गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास

‘एएसआय’ ला पोलीस आयुक्तांची होळीची खास भेट

काँग्रेस नेतृत्वावर ‘जी-२३’ क्षेपणास्त्राचा मारा

फक्त सेलिब्रिटींबद्दलच नाही तर महिलेने तिच्या तक्रारीत बिल्डरने दिलेल्या खोट्या आश्वासनांचाही उल्लेख केला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी प्रसिद्ध केलेली माहितीपुस्तक पाहून गुंतवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिने ज्या प्रकल्पासाठी गुंतवणूक केली होती, त्या प्रकल्पावर टेनिस अकादमी उघडली जाईल, असे तिला सांगण्यात आले. त्याच्या जाहिरातीत मारिया शारापोव्हा आणि मायकेल शूमाकरचे फोटो वापरण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा