संसदेची सुरक्षा भंग केल्याप्रकरणातील आरोपी सागर शर्मा याच्या डायरीच्या आधारावर गुप्तचर संस्था आणि दिल्ली पोलिसांचे विशेष पथक एकत्रच पडताळणी करत आहेत. या पथकाने डायरीच्या एका पानावर लिहिलेल्या २२ मोबाइल नंबरांची पडताळणी केली आहे. यातील नऊ मोबाइल नंबरवर एक महिने कोणताही फोन केला गेला नाही. या सर्व मोबाइल नंबरांपुढे त्यांची नावेही लिहिली आहेत. गुप्तचर संस्थेच्या एका पथकाने मंगळवारी चपलांच्या दुकानाच्या मालकाला गाडीमध्ये बसवून त्याची एक तास चौकशी केली.
दिल्ली पोलिसांचे विशेष पथक दोन दिवसांच्या चौकशीनंतर लखनऊला परतले आहेत. या पथकाला काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असल्याचा दावा केला जात आहे. सागरच्या डायरीच्या एका पानाला सर्वांत महत्त्वाचे मानले जात आहे. यात अनेक खाणाखुणा, काहींची नावे आणि मोबाइल नंबर आहेत. तसेच, तीन-चार ओळींचा अर्थ शोधला जात आहे. त्यामुळे यामागे काही मोठे लक्ष्य तर नव्हते ना, या दृष्टीने तपास केला जात आहे.
हे ही वाचा:
दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदींचे महत्त्वाचे विधान!
शाहरुखची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस
काँग्रेसची भारत जोडो यात्रा २ जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता!
इंडी आघाडीत ईव्हीएमविरोधात मतभेद, नीतिश कुमारांचा विरोध
सागरच्या कुटुंबीयांचे मौन
सागरचे पिता रोशनलाल, आई राणी आणि बहीण माही हे तिघे कोणाशीही बोलत नाहीत. आतापर्यंत हे कुटुंब सर्व प्रश्नांची उत्तरे देत होते. सागरच्या या कृत्यामुळे संपूर्ण कुटुंब गेल्या काही दिवसांपासून त्रासले आहे, असे शेजारी सांगतात. अनेक अधिकारी आणि तपास संस्थांनी त्यांची चौकशी केली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब त्रासले आहे. मंगळवारीदेखील त्यांच्या घरात शांतता होती. कुटुंबातील सदस्य एक-दोनदाच घराबाहेर पडले.