बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली आग्रीपाडा पोलिसांनी ४२ बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आगरीपाडा पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. सराव करता यावा म्हणून ४२ डॉक्टरांनी बनावट पदवी प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला (एमएमसी) दाखवले होते. पदव्युत्तर डिप्लोमाची प्रमाणपत्र दाखवून सरावासाठी परवाने मागितले होते.
बोगस कागदपत्रांवर परेल कॉलेजचे नाव असल्यामुळे एमएमसीने परेल कॉलेजमधील मुलांची यादी तपासली असता या विद्यार्थ्यांची नावे त्या यादीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हृद्यरोग, स्त्रीरोगशास्त्र, नेत्रशास्त्र आणि सर्जन या विषयातील पदव्युत्तर डिप्लोमामध्ये उत्तीर्ण झाल्याची कागदपत्रे दिली होती.
हे ही वाचा:
तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?
पुणे पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
आम्ही आता तपासाच्या प्राथमिक स्तरावर आहोत. सर्व कागदपत्रे नीट पाहून ज्यांनी ही कागदपत्रे दिली आहेत त्यांना आम्ही संपर्क करू. तपासणी नुकतीच सुरू झाली आहे, त्यामुळे आता काहीही सांगता येणार नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बनावट कागदपत्र कुठून आली आणि अजून कोणी व्यक्ती यात सामील आहेत याचा तपास पोलीस करतील. काही वर्षांपूर्वी विविध पोलीस ठाण्यात वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेण्यासाठी बोगस जातीचा दाखला दिल्या संबंधीच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्या तपासात काही लोकांना अटक केली होती तेव्हा काहींनी पैसे मिळवण्यासाठी असे काम केल्याचे समोर आले होते.
मानखुर्द आणि गोवंडी येथून पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाच बोगस डॉक्टरांना अटक केली होती. १० ते १५ वर्षांपासून परवाना नसताना आरोपी दवाखाना चालवत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पाचही डॉक्टर १०-१२वी शिकलेले होते.