25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरक्राईमनामापार्थ चॅटर्जी, अर्पिता मुखर्जींच्या अनेक बेनामी संपत्तीचा खुलासा

पार्थ चॅटर्जी, अर्पिता मुखर्जींच्या अनेक बेनामी संपत्तीचा खुलासा

Google News Follow

Related

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने पश्चिम बंगालमध्ये अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले होते. अर्पिता मुखर्जी या पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. आतापर्यंत अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच अनेक मोबाईल आणि सोनं जप्त करण्यात आलं आहे.
पार्थ आणि अर्पिता यांच्या संपत्तीबद्दल ईडी रोज नवनवे खुलासे करत आहे. अर्पिता आणि पार्थ यांच्या नावावर अनेक अघोषित मालमत्ता असल्याचं उघडकीस झालं आहे.

पार्थ चॅटर्जी अर्पिता यांच्या मालमत्तेची यादी पुढीलप्रमाणे

पश्चिम बंगालमधील भोलपूरमध्ये सात घरे आहेत.
शांतिनिकेतनामध्ये चार हजार चौरस फुटाचा संपूर्ण मजला आहे.
डायमंड सिटीमध्ये चार फ्लॅट्स, बेलघरिया क्लब टाऊनमध्ये एक, बारानगरमध्ये एक, कोलकात्यातील न्यूटाऊन मध्ये दोन, आसाममधील सोनापुरमध्ये एक घर
अशी एकूण नऊ फ्लॅट्स आहेत.
पश्चिम बंगालमधील जंगीपूरमध्ये आलिशान बंगला आहे.
४५ कोटी रुपये किमतीच्या जमिनीवर शाळा आहे. तसेच या शाळेच्या बांधकामासाठी ५० कोटी खर्च आला आहे.
पाळीव प्राण्यांच्या रुग्णलयासाठी १२ हजार २४० चौरस फूट जमीन यांच्या नावावर आहे.
बरुईपूरमध्ये तब्बल २५ बिघा जमीन आणि २४ एकर जमीन झारखंडमध्ये आहे.
सिंगूर, झारग्राम आणि बरुईपूरमध्ये प्रत्येकी एक अशी तीन फार्महाऊस आहेत.
सुंदरबनमध्ये एक गेस्ट हाऊस आणि रिसॉर्ट आहे.
सजनेखळी वन्यजीव अभयारण्यलगत एक रिसॉर्ट आहे.
बंतला लेदर कॉम्प्लेक्समध्ये, दहा बिघा जमीन ज्याचे मूल्य सुमारे २४ करोड आहे.
तसेच, बरदारमध्ये वाळू उत्खननासाठी डंपर आहेत.
पार्लर आणि कपड्यांमध्ये गुंतवणूक
मनोरंजनाची एक कंपनी आहे, अशी एवढी मालमत्ता पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या नावावर आहे.

हे ही वाचा:

गमछा फिरवत राऊत ईडीच्या कार्यालयात दाखल

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात 

‘संजय राऊतांची जागा नवाब मलिकांच्या शेजारी’

‘शिवसेना कुणाची’ याची सुनावणी ३ ऑगस्टला

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या मंत्रिमंडळातून भ्रष्ट मंत्री पार्थ चॅटर्जी यांची हकालपट्टी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा