27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाअँटिलिया समोर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवण्यात मनसुख हिरेन यांचा हात

अँटिलिया समोर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवण्यात मनसुख हिरेन यांचा हात

Google News Follow

Related

एनआयएचा खळबळजनक खुलासा

एनआयएने बुधवारी मनसुख हिरेन हा अंबानींच्या घरासमोर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवण्याच्या षडयंत्रामागचा वाझेचा सहकारी होता असा खळबळजनक खुलासा केला होता.

एपीआय सचिन वाझे सोबत अँटिलियासमोर जलेटीनची गाडी ठेवण्यामागे मनसुख हिरेन याचा देखील सहभाग होता. त्याबरोबरच त्यांना २ मार्च ते ३ मार्च दरम्यान मारण्यात आलं असा दावा एनआयएने केला होता. ठाण्याला एक व्यावसायिक असणाऱ्या मनसुख हिरेन यांच्या मालकीच्या गाडीत २० जिलेटीनच्या काड्या ठेवून ती गाडी अँटिलाया जवळ ठेवण्यात आली होती. ४ मार्चपासून बेपत्ता असलेल्या हिरेन यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी कळवा खाडीच्या जवळ सापडला होता.

हे ही वाचा:

काय डेंजर वारा सुटलाय

मुस्लिम तुष्टीकरणामुळे ममतांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

शेंबड्या मुलांसारख्या शपथा घेऊ नका

“मनसुख हिरेन यांचा जिलेटीनच्या काड्या असलेली गाडी ठेवण्यात हात होता, त्यांची हत्या करण्यात आली.” असे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितले. वाझेने मनसुख हिरेनच्या हत्येसाठी लागलेली पैशांची मदत केली असल्याचे एनआयएने न्यायालयात मांडले होते. वाझे सोबतच एनआयएने संशयित पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश गौर यांना देखील ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सचिन वाझेला आवश्यक ती सीमकार्ड खरेदी करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदे आणि गौर यांच्यावर मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचला त्यावेळेला तिथे उपस्थित असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

एनआयएला हिरेन आणि वाझे यांच्या १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले होते. त्याबरोबरच एनआयएला सचिन वाझे मनसुख हिरेनला जिलेटनच्या केसचे खापर स्वतःवर घ्यायला सांगताना दिसतो. मात्र मनसुख त्याला नकार देताना दिसतात.

त्याबरोबरच वाझेच्या नावावर नोंदणी असलेल्या एका कंपनीच्या खात्यात सुमारे दीड कोटी रुपये असतात, ज्यातले तो सुमारे ७६ लाख त्याच्या साथीदाराला देतो. एनआयएकडून हे पैसे जिलेटीन खरेदी करायला तर नाही ना वापरले गेले याचा शोध चालू आहे.

सिंग यांनी तपास यंत्रणेला अशा प्रकारे कोणता कट तर नाही ना रचण्यात आला याचा शोध घेण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सचिन वाझेला ९ एप्रिल पर्यंतची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा