मनसुख हिरेनवर विषप्रयोग केला नसल्याचे उघड

मनसुख हिरेनवर विषप्रयोग केला नसल्याचे उघड

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी तपास करणा-या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) व्हिसेरा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मनसुख यांचा मृत्यू कोणतेही विष देऊन करण्यात आला नसल्याचे  सूत्रांकडून सांगण्यात आले. यापर्वी शवविच्छेदन अहवालात मनसुख हिरेनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नव्हते.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या  स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा खाडी परिसरात सापडला होता.तो मृत्यू घातपाती असल्याचा संशय बळावला होता. मनसुख यांचा व्हिसेरा अहवाल एनआयएला प्राप्त झाला असून त्यात शरिरात कोणताही विषारी पदार्थ सापडला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा अहवाल प्रथम ठाणे पोलिसांकडे पाठवण्यात आला होता, पण हे प्रकरण एनआयएकडे असल्यामुळे तो अहवाल एनआयएला सुपूर्द करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पर्यावरणमंत्री आदित्य यांचे पर्यावरण प्रेम बेगडी

दोन डोसमधील अंतर कमी असल्यास ‘डेल्टा’ व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी

ठाकरे सरकार कधीही कोसळेल ते कळणारही नाही

रा.स्व. संघाच्या अनेक नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ट्विटरचा वार

एनआयएदेखील हिरेन यांचे व्हिसेरा नमुने केंद्रीय न्यायवैधक प्रयोगशाळेकडे पाठवणार असून त्यांच्याकडूनही त्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हिरेन यांची हत्या पाण्यात बुडवून करण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे. तसेच मृतदेह पाण्यावर लवकर येऊ नये, यासाठी आरोपींनी तोंडात रुमाल कोंबले होते. त्यावेळी डायटॉप तपासणीही करण्यात आली होती.

मनसुख यांची पत्नी विमल हिरेन यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाला(एटीएस) वर्ग करण्यात आले होते. मनसुख  यांच्या चेहऱ्याजवळ, डोळ्यावर आणि पाठीवर जखमा असल्याची बाब शवविच्छेदन अहवालात उघड झाली होती. या प्रकरणी अंतर्गत हत्या, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे हे प्रकरणही एनआयएला वर्ग करण्यात आले होते.  त्या वेळी शवविच्छेदन अहवाला नुसार, मनसुख यांच्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या.  त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतचा संशय आणखी बळावला होता.

Exit mobile version