मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) हा मोठा धक्का मानला जात आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) केला जात होता. हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) देण्याची मागणी विरोधीपक्षाकडून वारंवार केली जात होती.

हे ही वाचा:

मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह

अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात

प्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स

चीनच्या रणगाड्यांचा सामना करायला भारताकडे नवी क्षेपणास्त्रे

एनआयए आतापर्यंत केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत होती. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता तिन्ही केसचा तपास एनआयए करणार आहे.

एनआयएने तपास हाती घेतल्यावरच एपीआय सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. जोवर तपास महाराष्ट्र एटीएसकडून केला जात होता, तोवर सचिन वाझेला अटक केली गेली नव्हती. त्यामुळे आता मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे गेल्याने सचिन वाझेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version