मनीष सिसोदियांचा १७ एप्रिलपर्यंत मुक्काम तुरुंगातच

न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ

मनीष सिसोदियांचा १७ एप्रिलपर्यंत मुक्काम तुरुंगातच

दिल्लीचे माजी पमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ केली आहे.न्यायालयाने त्याच्या कोठडीत १७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. रद्द केलेल्या अबकारी धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात बुधवारी सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.

याआधी देखील राऊस एव्हेन्यू न्ययालयाने सीबीआय प्रकरणातही मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ एप्रिल २०२३पर्यंत वाढ केली होती. याआधी दिल्ली न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडून चौकशी करत असलेल्या अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्जही फेटाळला होता. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने आता सिसोदिया यांना १७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

मनीष सिसोदिया आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात एक पैसाही आला नाही. ईडीने त्याच्या घरावर छापा टाकून त्याचे बँक खातेही तपासले होते. ते सिसोदिया यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानीही गेले. जोपर्यंत मनी लाँड्रिंगचा संबंध आहे, त्यांच्याविरुद्ध कोणताही खटला चालवता येणार नाही असा युक्तिवाद मनीष सिसोदिया यांचे वकील विवेक जैन यांनी न्यायालयात केला. अधिवक्ता विवेक जैन म्हणाले, मनीष यांच्या विरोधात पीएमएलमध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही. पीएमएलए कायद्याच्या कलम ४५ नुसार कलम ३अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावरच त्याच्यावर कारवाई केली जाईल.

सिसोदिया यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर,आम्ही नवीन पुरावे गोळा करण्यात गुंतलो आहोत. आताही या प्रकरणात काही महत्त्वाचे पुरावे आहेत जे समोर आलेले नाहीत असे ईडीच्या वकिलांनी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामिनावर युक्तिवादासाठी १२ एप्रिलची तारीख निश्चित केली.त्याचवेळी सीबीआय प्रकरणानंतर ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

फडतूस नही काडतूस हूँ, झुकेगा नही, घुसेगा!!

भेगा असल्या तरी गेटवे ऑफ इंडिया सुस्थितीत

केरळ गाडी जाळपोळ प्रकरणातील आरोपीला रत्नागिरीत घातल्या बेड्या

१२ लाख डॉलर दंड भरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुटले!

रद्द केलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ मध्ये कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात अनेक चौकशीच्या फेऱ्यांनंतर सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी आप पक्षाचे नेते सिसोदिया यांना अटक केली होति . सीबीआयने २६ फेब्रुवारीला सिसोदिया यांना अटक केल्यानंतर, ईडीनेही याच प्रकरणात ९ मार्चला त्याला अटक केली होती. माजी उपमुख्यमंत्र्यांच्या ईमेल आणि मोबाईलमधील मोठ्या प्रमाणात डेटाचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात असल्याची माहिती तपास संस्थेने न्यायालयाला दिली होती.

Exit mobile version