दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली. सीबीआयच्या पथकाने मनीष सिसोदिया यांची तब्बल ९ तास चौकशी केली. मनीष सिसोदिया सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी तपास पथकाने या घोटाळ्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न मनीष सिसोदिया यांना विचारले.
दरम्यान, चौकशीनंतर सीबीआय कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया दिली. हा घोटाळ्याचा मुद्दा नसून हे संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचे ते म्हणाले. तसेच हे तपासासाठी नसून ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी करण्यात आले आहे, असंही ते म्हणाले.
सीबीआयने सोमवारी मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. मनीष सिसोदिया काल सकाळी ११.१५ च्या सुमारास दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पोहचले होते. यांच्या या चौकशीला आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांनी विरोध केला होता. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. यानंतर तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संजय सिंह आणि अन्य काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
हे ही वाचा
महाराष्ट्र कोणासोबत हे ग्रामपंचायत निवडणुकीने दाखवून दिले
बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
सीबीआय चौकशीसाठी हजर राहण्यापूर्वी मनीष सिसोदिया म्हणाले होते की, “मला अटक झाली तर पश्चात्ताप करू नका, पण अभिमान बाळगा. देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”