मणिपूर: महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !

मणिपूरमधील घटना अत्यंत लज्जास्पद, दोषींना कठोर शिक्षा देणार, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

मणिपूर: महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मणिपूर पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातली ही पहिली अटक आहे. दोन महिलांना नग्न करण्यात आलं आणि त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मणिपूरमध्ये घढला. मणिपूर मागच्या दोन-तीन महिन्यांपासून धुमसतं आहे. अशात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरातून संतप्त व्यक्त केला जात आहे.

एकीकडे भारतातील महिला सुरक्षित आहेत असे भासत असले तरी मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेमुळे महिला आजून असुरक्षित असल्याचे दिसून येते.या घटनेची कसून तपासणी करून आरोपीना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात आली.पोलिसांनी तपासणी करत घटनेशी संबंधित एका आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी आरोपीचं नाव हेरम हेरा दास असं असून तो थौबलचा रहिवासी आहे असं सांगितलं आहे. येत्या काही तासांमध्ये आणखी काही आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात बलात्कार आणि हत्येची कलमं दाखल करण्यात आली आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. हिंदुस्थान टाइम्सने या विषयीचे वृत्त दिले आहे.

हे ही वाचा:

वाढदिवस साजरा न करण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर अटकेत

मणिपूरच्या घटनेमुळे मोदी संतापले

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह

या प्रकरणामुळे माझे मन प्रचंड दुखावले आहे असं ट्वीट मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. महिलांविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अमानुष कृत्य करण्यात आलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी पहिली अटक केली आहे असंही मुख्यमंत्री सिंह यांनी म्हटलं आहे. तसंच सरकार म्हणून आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झाली नव्हती. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं, त्यानंतर आज सकाळी या प्रकरणातल्या पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केलं. ते म्हणाले, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” आता पोलीस अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

मणिपूरमधील घटना अत्यंत लज्जास्पद पंतप्रधान मोदी

पावसाळी अधिवेशनासाठी (Monsoon Session) संसदेत पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधत मणिपूरमधील घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, “मणिपूरमध्ये जी घटना घडली आहे ती कोणत्याही समाजासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. ज्यांनी हा गुन्हा केला ते अद्याप समोर आलेले नाहीत पण यामध्ये देशाचं नाव बदनाम होत आहे.”तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एन बिरेन यांना त्यांच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपल्या माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी आणखी कठोर निर्बंध करण्यास पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री बिरेन यांना सांगितलं आहे.

Exit mobile version