मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत जमाव महिलांना विवस्त्र करून रस्त्याने घेऊन जाताना आणि नंतर एका शेतात घेऊन जाताना दिसला. यात जमावातील काही लोक पीडितेच्या शरीराला ओरबाडत विटंबना करत असल्याचंही दिसलं. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. या प्रकरणातील चार जणांना अटक करण्यात आली होती. आता पाचव्या आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय तणाव निर्माण होऊन हिंसाचार झाला. यानंतर एक दिवसाने जमावाने या महिलांना विवस्त्र करत त्यांच्यावर अत्याचार केले. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ बुधवारी (१९ जुलै) इंटरनेटवरील निर्बंध शिथिल केल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ही घटना समोर आली. यानंतर राज्य व केंद्र सरकार खडबडून जागे झाले. आतापर्यंत या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.आता या घटनेसंबंधित पाचव्या आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अटक करण्यात आलेल्या पाचाव्या आरोपीचे नाव यमलेम्बम नुंगसिथोई मेटाई असे आहे.
हे ही वाचा:
इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांची संख्या २२ वर, शोधकार्य सुरू
इर्शाळवाडीमधील अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व एकनाथ शिंदे स्वीकारणार
विराट कोहलीची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी आणि दुःख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे देशाचा अपमान झाला असून दोषींना सोडले जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या पूर्वी अटक करण्यात आलेल्या चार आरोपीना शुक्रवारी ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी फेनोम गावातील घडलेल्या घटनेत सामील असलेल्या जमावाचा एक भाग होता आणि व्हिडिओमध्ये पीडित महिलांपैकी एकाला ओढताना दिसत आहे.या आरोपीचे हुजरेम हेरदास सिंग असून त्याला थौबल जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली.