मणिपूरमधील जातीय हिंसाचाराची आग अजूनही विझलेली नाही. बुधवारी टेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, अतिरेक्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) जवळील सुरक्षा दलाच्या चौकीवर बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला.सुरक्षा दलाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.या हल्ल्यात एका सुरक्षा जवानाला वीर मरण आले आहे.
हल्लेखोरांनी बुधवारी पहाटे चारच्या सुमारास जवानांवर हल्ला केला.पोलिसांनी सांगितले की, अतिरेक्यांनी मोरेह शहरातल्या स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ असणाऱ्या सुरक्षा चौकीवर बॉम्ब फेक केला आणि गोळीबार केला.त्यानंतर सुरक्षा दलांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले.परंतु, या हल्ल्यात मणिपूर मधील एका सुरक्षा जवान हुतात्मा झाला तर एक जवान जखमी झाला आहे.जखमी झालेल्या जवानाला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.हल्लेखोरांकडून हल्ल्यासाठी रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG)चा वापर करण्यात आला होता.
हे ही वाचा:
माजी सैनिकाची अनोखी रामभक्ती; ७ कोटी वेळा लिहिले ‘श्री राम’
विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट
२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने आम्ही येऊ शकत नाही, कृपया कारवाई करू नये!
दरम्यान, मणिपूरमध्ये ३ मे २०२३ पासून कुकी आणि मीतेई समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू आहे. ४ डिसेंबर रोजी, इंटरनेट बंदी उठवताच, तेंगनौपालमध्ये दोन दहशतवादी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात १३ लोक ठार झाले.मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत एकूण २०० लोकांचा मृत्यू झाला आहे .