23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामासंग्रहालयातून १५ कोटींच्या वस्तू चोरल्या; पण चोर २५ फूट भिंतीवरून कोसळला!

संग्रहालयातून १५ कोटींच्या वस्तू चोरल्या; पण चोर २५ फूट भिंतीवरून कोसळला!

पोलिसांकडून आरोपीला अटक

Google News Follow

Related

भोपाळमधील एका संग्रहालयात चोरीची मोठी घटना घडली आहे. श्यामला हिल्स येथील स्टेट म्युझियममध्ये ही चोरी आहे. चोरट्याने हिंदी चित्रपट ‘धूम’ सारख्या स्टाईलमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद यादव असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने १ सप्टेंबर (रविवार) रोजी तिकीट खरेदी करून संग्रहालयात घुसला आणि संध्याकाळी संग्रहालय बंद होत असताना एका जिन्याच्या मागे जाऊन लपला. सोमवारी संग्रहालय बंद असल्याने त्याने मौल्यवान वस्तू गोळा करून आपल्या बॅगेत ठेवल्या, यामध्ये गुप्त युगापासून मुघल काळापर्यंतची २०० हून अधिक सोन्या-चांदीची नाणी, आणि इतर कलाकृती चोरल्या. मात्र बाहेर पडण्यासाठी सुमारे २५ फूट उंचीच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना तो खाली पडला.

हे ही वाचा : 

संख्याबळाच्या आधारेच मुख्यमंत्री ठरणार!

सहा दिवसांमध्येचं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात २० पदके!

टेक्सासमध्ये भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

मंगळवारी (३ सप्टेंबर) संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी संग्रहालय उघडले तेव्हा आतील वस्तू चोरीला गेल्याचे समजले आणि आरोपी भिंतीजवळ जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या पायाला गंभीर जखम झाली होती. संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी श्यामला हिल्स पोलिस स्टेशनला याची माहिती देत आरोपीच्या बॅगमधून सोन्या-चांदीचे दागिने, नाणी आणि इतर साहित्य असा सुमारे १५ कोटी रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा