धक्कादायक! … म्हणून तो देणार होता बायकोचा बळी!

धक्कादायक! … म्हणून तो देणार होता बायकोचा बळी!

जालना जिल्ह्यातील डोणगावात पतीने पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला तांत्रिक, एक पुरुष आणि महिलेच्या पतीला अटक केली आहे.

गुप्तधन मिळवण्याच्या लोभापायी पतीने हा सर्व घाट घातल्याचे टेंभूर्णी पोलिसांनी सांगितले. संबंधित प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवल्यावर पोलिसांनी संतोष पिंपळे, जीवन पिंपळे आणि एका महिला तांत्रिकाला अटक केली.

संतोष पिंपळे हा व्यसनी होता आणि तो त्याचा बहुतांश वेळ हा स्मशानभूमीजवळ घालवायचा. तो आपल्या पत्नीला सतत गुप्तधन मिळेल असे सांगत असे. २२ सप्टेंबरच्या रात्री संतोषने एका महिला तांत्रिकला गुप्तधन शोधण्यासाठी त्याच्या घरी आणले. त्यानंतर काही विधी करून त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या पत्नीला गुप्तधन शोधण्यासाठी तिला मानवी बळी यज्ञास अर्पण करणार असल्याचे सांगितले. त्याने काही विधी सुरू केले आणि पत्नीने विरोध करताच तिला मारहाण करायला सुरुवात केली. महिलेने या प्रकरणाची माहिती ग्रामस्थांना दिल्यावर महिलेच्या वडिलांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.

हे ही वाचा:

भारत-तैवानमधील ‘हा’ करार वाढवतोय चीनची चिंता

तालिबानी फतवा; दाढी कापू नका, विदेशी हेअरस्टाइल नको!

काय आहे आयुष्यमान भारत कार्ड?

लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?

संतोष आणि जीवन हे डोणगावचे रहिवासी आहेत, तर महिला तांत्रिक बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तहसीलची रहिवासी आहे, असे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. आरोपींविरोधात महाराष्ट्र प्रतिबंध आणि मानवी बलिदानाचे निर्मूलन आणि इतर अमानवी, वाईट, अघोरी प्रथा आणि काळा जादू कायदा आणि काही आयपीसी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version