युट्यूब व्हिडिओ बघून पत्नीच्या प्रसुतीचा प्रयत्न, पण…

युट्यूब व्हिडिओ बघून पत्नीच्या प्रसुतीचा प्रयत्न, पण…

तामिळनाडूमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका इसमाने युट्यूब व्हिडिओ पाहत त्याच्या पत्नीची प्रसूती करण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या या बेजबाबदार स्टंटमुळे त्या अर्भकाचा मात्र दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

ही घटना तामिळनाडूतील राणीपेट येथे घडली. २८ वर्षीय महिलेच्या पतीने युट्यूब व्हिडिओ पाहत प्रसूती प्रक्रियेचा प्रयत्न केल्यामुळे अर्भक मृत जन्माला आले. गोमती या महिलेचे नाव असून प्रसूतीदरम्यान प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने ती बेशुद्ध पडली. हा सगळा प्रकार घडल्यानांतर तिच्या पतीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात केले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

गोमती हिला पुन्नई प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) नेण्यात आले. त्यानंतर तिला वेल्लोरच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले जेथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

प्राथमिक आरोग्य सेवा अधिकारी मोहन यांनी तक्रार दाखल केली की, गोमतीचे पती लोगनाथन यांनी वैद्यकीय मदत घेण्याऐवजी स्वत:च बाळंतपणाची प्रक्रिया केली.

हे ही वाचा:

सरसंघचालक मोहन भागवतांची तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांशी भेट

जानेवारीत होणार आयपीएल मेगा लिलाव?

हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटलांना दिले हे उत्तर

मल्हार महोत्सव जपणार महाराष्ट्राची संस्कृती

 

लोगनाथन आणि गोमथी यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना १३ डिसेंबर रोजी मूल होण्याची अपेक्षा होती. तथापि, १८ डिसेंबरची निर्धारित तारीख ओलांडून गोमतीला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यादरम्यान, लोगनाथनने त्याची बहीण गीता हिची मदत घेऊन युट्यूब व्हिडिओ वापरून प्रसूती प्रक्रियेचा प्रयत्न केला.

पोलिसांनी बाळाच्या मृत्यूसह संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Exit mobile version