पुण्यातील सुरेश पिंगळे नामक व्यक्तीने स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे पोलिसांच्या असंवेदनशील आणि बेजबाबदार निर्भेळ कंटाळून सुरेश पिंगळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. बुधवार, १८ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेने पुण्यासोबतच सारा महाराष्ट्र हादरला आहे. तर या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे.
सुरेश पिंगळे हे ४० वर्षांचे गृहस्थ पुण्यातील एआरडीए या शासकीय संस्थेत कार्यरत आहेत. त्यांचे हे काम कंत्राटी पद्धतीचे आहे. या कंत्राटाचे दर वर्षी नूतनीकरण केले जाते. या नूतनीकरणासाठी पिंगळे यांना पोलिसांकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घेणे गरजेचे असते. ज्यामध्ये संबंधित व्यक्तीवर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही ह्याचे व्हेरिफिकेशन केले जाते.
हे ही वाचा:
तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?
महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
पण सुरेश पिंगळे यांना त्यांच्या नावावर ३ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक ते गुन्हे सुरेश पिंगळे नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीवर दाखल होते. पोलिसांना हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरेश पिंगळे यांनी केला. सुरेश पिंगळे या एकाच नावाच्या दोन भिन्न व्यक्ती असल्याचे वारंवार सांगूनही पोलिस त्यांना दाद देत नव्हते. अखेर या नैराश्यातून सुरेश पिंगळे यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
बुधवार, १८ ऑगस्ट रोजी सुरेश पिंगळे यांनी अकरा सडे अकराच्या सुमारास पुण्यातील पोलिस आयुक्तालयासमोर स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या आत्मदहनाच्या प्रयत्नात पिंगळे हे गंभीररीत्या भाजले आहेत. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.