कर्ज द्यायला नकार, पेटवून दिली बँक

कर्ज द्यायला नकार, पेटवून दिली बँक

बँकेने कर्ज नाकारल्याचा रागातून बँकेवर पेट्रोल टाकत बँक पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकमधून समोर आला आहे. शनिवार, ८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कर्नाटक मधील हवेरी जिल्ह्यात ही घटना घडली. हवेरी जिल्ह्यातील ब्यादगी तालुक्यात हेडीगोंडा गावात हा प्रकार घडला आहे.

वासिम हजरतसाब मुल्ला असे या बँक पेटविणाऱ्या इसमाचे नाव असून कर्नाटक मधील रत्तीहल्ली गावचा रहिवासी आहे. वासिमने हेडीगोंडा गावातील कॅनरा बँकेच्या शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता. पण त्याचा सिबिल स्कोर कमी असल्यामुळे बँकेने त्याचे कर्ज नाकारले. पण मुल्ला हा नकार पचवू शकला नाही. या नकाराने त्याचा प्रचंड संताप झाला. याच रागातून शनिवारी रात्री मुल्ला कॅनरा बँकेच्या परिसरात आला. त्याने बँकेच्या खिडकीची काच फोडली. या खिडकीतून त्याने बँकेत पेट्रोल ओतले आणि बँक पेटवून दिले.

हे ही वाचा:

विवो आयपीएल आता टाटा आयपीएल

कुस्तीगीराच्या हत्येआधी सुशीलकुमारने स्टेडियममध्ये कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या…

मोलनुपिरावीर उपयुक्त की धोकादायक?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

बघता बघता कॅनरा बँकेत ही आग पसरली. या आगीमुळे निर्माण झालेला धूर आजूबाजूला पसरू लागला. त्या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी हा धूर पाहिला. यामुळे त्यांना काही तरी गडबड असल्याचे जाणवले. जवळ जाऊन बघितल्यावर त्यांना बँकेला आग लागल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला या संदर्भात माहिती दिली. तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी यशस्वीपणे ही आग आटोक्यात आणून विझवली.

या सर्व प्रकरणाची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत बँकेतील, कॅश काऊंटर, सीसीटीव्ही कॅमेरे, पाच कॉम्प्युटर्स, पासबुक प्रिंटर, स्कॅनर, कॅश काउंटिंग मशीन, ट्यूबलाइट, पंखे, महत्त्वाची कागदपत्रे आणि बँकेतील फर्निचर जळून खाक झाले. तब्बल बारा लाख रुपयांचा ऐवज होता.

Exit mobile version