गुगलवर ‘सुसाईड बेस्ट वे’ च्या शोधात असणाऱ्या तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. इंटरपोल कडून आलेल्या ई-मेल नंतर मुंबई गुन्हे शाखेने या तरुणाला मालाड मालवणी येथून शोधून त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले.
हा तरुण २८ वर्षाचा असून मूळचा राजस्थान राज्यातील आहे.काही वर्षांपासून तो मिरारोड येथे नातेवाईकाकडे राहण्यास आला होता. या तरुणाची आई पूर्वीपासून मालाड मालवणी येथे राहण्यास होती, व सध्या ती एका गुन्ह्यात मागील दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या या तरुणाची ६ महिन्यापासून नोकरी गेली व तो बेरोजगार झाला होता. दुसरी नोकरी मिळत नसल्यामुळे तसेच तुरुंगात असलेल्या आईला जामीन मिळत नसल्यामुळे मानसिक तणावात होता.
हेही वाचा..
कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्या
रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड
गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा
भाजपा अध्यक्ष नड्डा आरती करताना मोठी दुर्घटना टळली !
मानसिक तणावामुळे नैराश्य आलेल्या तरुणाची जगण्याची इच्छा संपली होती, त्यात तो आत्महत्या करण्यासाठी उपाय शोधू लागला होता , दोन दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या करण्यासाठी गुगलवर ‘सुसाईड बेस्ट वे’ (आत्महत्येसाठी चांगला मार्ग) असे सर्च करीत करीत होता. ही माहिती गुगल कडून इंटरपोलला देण्यात आली. इंटरपोलने या तरुणाचे लोकेशन शोधून मुंबई पोलिसांना मेल पाठवला. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११च्या पथकाने या तरुणाचा पत्ता शोधून त्याला मालाड मालवणी येथून ताब्यात घेऊन त्याला कक्ष कार्यालयात आणून त्याचे समुपदेशन करत त्याचे मनपरिवर्तन करून त्याच्यासाठी चांगली नोकरी शोधण्याचे आश्वासन पोलिसानी दिले. दरम्यान पोलिसानी या तरुणाच्या चुलत भावाला फोन करून त्याला त्याच्या ताब्यात दिले.