अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा धमकीचा तो फोन चेन्नईमधून ..

धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा धमकीचा तो फोन चेन्नईमधून ..

उत्तर प्रदेशाच्या अयोध्येतील श्री राम मंदिर उडवून देण्याची धमकी काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्याचा भांडाफोड झाला आहे. .धमकी देणारी व्यक्ती बिलाल नावाची असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. हा फोन चेन्नईतून इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

श्री राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा व्यक्ती बिलाल नसून अनिल रामदास आहे. बिलालला फसवून तुरुंगात पाठवण्याच्या कटाचा भाग म्हणून त्याने हा धमकीचा फोन केला होता असा खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून नऊ मोबाईल फोन्सशिवाय अनेक बँकांचे चेकबुक आणि पासबुक जप्त केले आहेत.

आरोपीने रामलला सदनमध्ये राहणाऱ्या मनोज कुमार यांच्या मोबाइलवर २ फेब्रुवारीला कॉल केला होता . यामध्ये आरोपींनी राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती. मनोजच्या माहितीवरून अयोध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यादरम्यान दिल्लीत राहणाऱ्या बिलालचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. पोलिसांनी तातडीने बिलालला ताब्यात घेऊन चौकशी केली. यादरम्यान बिलाल निर्दोष असल्याचे समोर आले. त्याला या घटनेची माहितीच नाही, तर त्याला गोवण्यासाठी अन्य कोणीतरी ही घटना घडवून आणली असल्याचे आढळून आलत्याचे पोलिसांनी सांगितले .

हे ही वाचा:

महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दिनदयाळ उपाध्याय

फक्त ५०० रुपये दिले नाहीत म्हणून केला खून

रोहित पवारांनी राहुल-राऊतांना खुळ्यात काढले?

उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहिली नाही का?
बिलालची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मोबाईल फोनचा आयपी अॅड्रेस ट्रेस केला ज्यावरून मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हा फोन कॉल चेन्नईतून इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती मिळाली. अनिल रामदास असे फोन करणाऱ्याचे नाव आहे. तो तेथे पत्नीसह राहत होता, मात्र बिलालच्या बहिणीशी भांडण झाल्यानंतर त्याने बिलालला अडकवण्याचा कट रचला आणि इंटरनेट कॉल करून मंदिर उडवून देण्याची धमकी दिली.

Exit mobile version