ओटीपी शिवाय पैसे लुटण्याचे नवे तंत्र वापरले जाते का?

एका व्यक्तीच्या बँक खात्यातून चक्क ५० लाख रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले.

ओटीपी शिवाय पैसे लुटण्याचे नवे तंत्र वापरले जाते का?

सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ओटीपी कोणाशीही शेअर करू नका असा सल्ला वारंवार दिला जातो. पण, आता सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधत आहेत.

अशीच एक फसवणुकीची घटना दिल्लीत एका व्यक्तीसोबत घडली. एका व्यक्तीच्या बँक खात्यातून चक्क ५० लाख रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले. सुरक्षा सेवेत संचालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. त्याच्या फोनवर संध्याकाळी ७ ते ८.४४ च्या दरम्यान काही मिस कॉल्स आले होते. माहितीनुसार गुन्हेगारांनी ओटीपी न मागता हे सर्व व्यवहार पूर्ण केले.

हे ही वाचा : 

अजबचं! कोण आधी फोटो काढणार? प्रश्नावरून लग्न मंडपात हाणामारी

पदयात्रेला ब्रेक देऊन राहुल गांधी परदेश यात्रेला जाणार?

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

पेरूमधील आंदोलकांनी विमानतळ घेतले ताब्यात ; पोलिस अधिकाऱ्यांना ठेवले ‘ओलीस’

या व्यक्तीच्या फोनवर काही मिस्ड कॉल होते. सुरुवातीला त्याने या फोनकडे दुर्लक्ष केले कारण ते अनोळखी नंबरचे होते. पण, काही कॉल उचलल्यानंतर फोनमधून कोणताही आवाज आला नाही. काही वेळाने त्याच्या फोनवर आलेला मेसेज पाहून त्याला धक्काच बसला. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) द्वारे त्याच्या बँक खात्यातून ५० लाख रुपये लुटण्यात आले. या घटनेबाबत तक्रार त्वरित दाखल करण्यात आली आहे. तसेच ही फसवणूक जामताडा येथील लोकांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जामतारा – झारखंडचा आदिवासी जिल्हा जिथे समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी १८ वर्षे काम केले. पण आता हे चित्र बदलले आहे. आता हा भाग सायबर गुन्ह्यांचे केंद्र बनले आहे. आता ओटीपी शिवाय सुद्धा पैसे लुटण्यात येत आहेत म्हणूनच जनतेला सावध राहायचे आव्हान पोलिसांनी दिले आहे.

Exit mobile version