त्रिपुरात अल्पवयीन पत्नीची हत्या करून तुकडे भरले बॅगेत

पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

त्रिपुरात अल्पवयीन पत्नीची हत्या करून तुकडे भरले बॅगेत

त्रिपुरामधील एका व्यक्तीने स्वत:च्या अल्पवयीन पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार मिळाली होती. तेव्हा तपासाअंती त्यांना बॅगेमध्ये दोन तुकडे केलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरच्या केलेल्या हत्याकांडाची आठवण या हत्येमुळे झाली.

हत्या करण्यात आलेल्या १५ वर्षीय मुलीचे नाव तनुजा बेगम आहे. तनुजाचा छोटा भाऊ बापन मियाने सांगितले की, सुमारे आठ महिन्यांपूर्वी तनुजाचा निकाह कायम मियाशी झाला होता. तनुजा गायब असल्याचे शुक्रवारी सकाळी तनुजाच्या आईला समजले. त्या लगेचच त्यांची मुलगी तिच्या पतीसह जिथे राहात होती, त्या मुस्लिमपारा भागात पोहोचल्या. तिथे तिला रक्ताचे डाग आढळले, मात्र तनुजा किंवा तिचा पती सापडला नाही. त्यानंतर तिने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. शुक्रवारी सकाळी तनुजाच्या नातेवाइकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आता पकडण्यात आले आहे.

हे ही वाचा:

गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

दोन महिलांच्या भांडणानंतर गोळीबार, एका महिलेने गमावला जीव

दंतेवाड्यात दोन महिने आधीच पेरण्यात आली होती स्फोटके !

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या

पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांत तनुजाचा पती कायम मियाला अटक केली. चौकशीत मियाने गुरुवारी रात्रीच तनुजाची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच, तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून दोन्ही बॅगा जंगलमध्ये ठेवल्याचे सांगितले.

पोलिसांनी या दोन्ही बॅगा जप्त केल्या आहेत. पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळताच अवघ्या चार तासांत कायम मियाला अटक केली. त्याने ही हत्या का केली आणि या हत्येत कोणा तिसऱ्या व्यक्तीचाही सहभाग होता का, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

Exit mobile version