भरवेगात जाणाऱ्या स्कूटी चालकास जाब विचारणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात स्कुटी चालकाने सिमेंट ब्लॉकने प्रहार करून हत्या केल्याची घटना सांताक्रूझ पूर्व येथे घडली. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी स्कुटी चालकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ओमप्रकाश मालहू शर्मा (४१) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर आरोपी स्कुटीचालक अहमद एहसान अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ओमप्रकाश मालहू शर्मा हा सांताक्रुज येथील गोळीबार, पाचवा रोडवर राहत असून कारपेंटर आहे. रविवारी पहाटे ओमप्रकाश हा त्याचा मित्र राजमंगल गुप्ता याच्यासोबत घराच्या दिशेने जात होता. यावेळी आरोपी अहमद हा स्कूटीवरुन भरवेगात जात होता. सांताक्रूझ पूर्व चिमनलाल शाळेसमोर आल्यानंतर त्याने अचानक स्कूटीला जोरात ब्रेक लावला होता. यावेळी ओमप्रकाश अहमदला हेलिकॉप्टर चालवतो का अशी विचारणा केली होती. त्यावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.
हे ही वाचा:
भारतीय विद्यार्थी बदर खान अमेरिकेत करत होता हमासचा प्रचार; केली अटक
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा
दिल्लीमधील ‘अकबर रोड’ लिहिलेल्या साइन बोर्डला काळे फासून महाराणा प्रताप यांचा लावला फोटो
नागपूर हिंसाचार प्रकरणाचा मास्टरमाइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
रागाच्या भरात अहमद त्याने ओमप्रकाशच्या डोक्यात तिथे असलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने प्रहार केला, त्यात ओमप्रकाश हा गंभीर जखमी झालात्याला तात्काळ व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता, मात्र ओमप्रकाशच्या मृत्यूनंतर आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या अहमद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.