प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तरुणाने केली भाजप आमदाराच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या !

लखनऊमधील घटना

प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तरुणाने केली भाजप आमदाराच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या !

लखनौच्या हजरतगंज भागातील नवीन दारूल सफा येथे भाजप आमदार योगेश शुक्ला यांना दिलेल्या सरकारी फ्लॅटमध्ये एका ३० वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.श्रेष्ठ त्रिपाठी असे मृताचे नाव असून तो मूळचा बाराबंकी येथील रहिवासी आहे.

प्रेयसीसोबत वाद झाल्याने एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. भाजप आमदार योगेश शुक्ला याना लखनौच्या हजरतगंज भागात सरकार कडून देण्यात आलेल्या सरकारी इमारतीमध्ये श्रेष्ठ त्रिपाठी या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार, श्रेष्ठ त्रिपाठी हा आमदारांच्या मीडिया सेलमध्ये काम करत होता. आमदार योगेश शुक्ला याना देण्यात आलेल्या हजरतगंजच्या लालबाग भागातील सरकारी इमारतीमध्ये फ्लॅट क्रमांक-८०४ मध्ये राहत असल्याचे, पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

मध्य विभागाच्या पोलिस उपायुक्त अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, घटनास्थळाची पाहणी केली असता मृताने रविवारी रात्री ११:३० ते १२ च्या सुमारास आपले जीवन संपवले असल्याचे निष्पन्न झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रेयसीसोबत झालेल्या वादानंतर त्या व्यक्तीने आपला जीव घेतला.जेव्हा ही घटना सुरु होती तेव्हा त्याची मैत्रीण फ्लॅटच्या गेटवर उभी होती आणि हा तरुण तिला व्हिडिओ कॉल करत असताना त्याने गळफास लावून घेतला, असे डीसीपीने सांगितले.

घटना घडत असताना त्याठिकाणावरील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन फ्लॅटचा दरवाजा तोडून मृतदेह खाली आणल्याचे पोलिसांनी सांगितले.रूममध्ये कोणतीही सुसाइड नोट नसल्याचे पोलिसांनी सांगितले.मृत श्रेष्ठ आणि त्याच्या मैत्रिणीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. फॉरेन्सिक टीमने खोलीचीही तपासणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Exit mobile version