सध्या बँकांव्यतिरिक्त अनेक लोनऍप आहेत. ज्यांच्याकडून त्वरित लोन मिळेल अशी जाहिरातबाजी केली जाते. कमी व्याजावर लोन दिले जाईल किंवा त्वरित लोनची रक्कम दिली जाईल असं या जाहिरातींमध्ये असते. मात्र एका व्यक्तीने या लोनऍप प्रकरणातून आत्महत्या केली आहे.
संदीप कोरेगावकर असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. कोरेगावकर यांनी लोनऍप वाल्यांकडून पाच हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनतर लोनऍपवाल्यांकडून अनेकदा या तरुणाला कर्ज फेडण्यासाठी वारंवार फोन येत असे. त्या व्यक्तीच्या नातेवाइकांना देखील लोन ऍपवाल्यांनी अनेकदा फोन करून त्रास दिला. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून संदीप यांनी आत्महत्या केली आहे.
आत्महत्येनंतर कुरार पोलिसांनी संदीप कोरेगावकर यांच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी राजू खडावने याला सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. संदीप यांच्या आत्महत्येचा गुन्हा कुरार पोलीस ठाण्यात दाखल केला होता. गुन्ह्याचा समांतर तपास सायबर पोलिसांकडून सुरू होता त्यानंतर मृत्यूपूर्वी संदीप यांना त्रास देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
भाजपचा तिसरा उमेदवार, सातवा उमेदवार आल्याने स्पर्धा
पुतीन यांचा मृत्यू? ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेचा दावा
नेपाळमधील त्या बेपत्ता विमानात ठाण्याचे चार प्रवासी
पदर्पणाच्या हंगामतच गुजरात टायटन्सने आयपीएलच्या विजेतेपदावर कोरलं नाव
अवघ्या पाच हजारासाठी पीडितेला आरोपीने मानसिक त्रास दिला होता. तसेच बदनामी देखील केली होती या संपूर्ण प्रकरणाला कंटाळून अखेर संदीप यांनी आत्महत्या केली आहे.