माणुसकीला काळिमा लावणारी एक क्रूर घटना ठाण्यातील कळवा भागातून समोर आली आहे. जिथे दुसऱ्या स्त्रीवर प्रेम जडल्यामुळे नवऱ्याने त्याच्या बायकोला जिवंतपणी पेटवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही पिडीत महिला गरोदर होती. तिला सहावा महिना सुरु होता. या प्रकरणात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कळवा भागातील मफतलाल कॉलनी परिसरात अनिल चौरासिया हा आपल्या पत्नी सोबत राहत होता. त्याची डोंबिवलीतील निहारिका नावाच्या तरुणी सोबत ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अनिल चौरासिया आणि निहारिक यांना एकमेकांशी लग्न करायचे होते. दरम्यान या प्रेम संबंधांबद्दल अनिल चौरसिया याच्या बायकोला समजले.
हे ही वाचा:
आता मला कोणतीही माहिती देण्याची इच्छा नाही
शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?
घरोघरी जाऊन लसीकरण करा, मोदींचे राज्यांना आदेश
गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश
यावरून चौरासिया दाम्पत्याच्या वादंग सुरु झाला. अशातच करवा चौथच्या दिवशी अनिल चौरासियाची प्रेयसी नहरीक ही त्यांच्या घरी येऊन धडकली. तिने आणि अरुणने विवाह केला असल्याची माहिती तिने उघड केली. यावरून अनिल आणि त्याच्या पत्नी मधील वाद विकोपाला गेले.
३१ ऑक्टोबर रोजी अशाच प्रकारचा एक मोठा वाद चौरासिया दाम्पत्यामध्ये झाला. यावेळी अनिल चौरासिया याने रागाच्या भरात पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत चौरासिया यांच्या पत्नीच्या पोटातील सहा महिन्यांच्या गर्भाचा मृत्यू झाला आहे. तर महिला अत्यंत गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अनिल चौरासिया याला अटक करण्यात आली आहे.